काश्मीरमध्ये अपहरण केलेल्या ३ पोलिसांची आतंकवाद्यांकडून हत्या

जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथून अपहरण करण्यात आलेल्या ४ पैकी ३ पोलिसांची आतंकवाद्यांनी हत्या केली, तर एका पोलिसाची सुखरूप सुटका झाली आहे. हत्या झालेल्यांमध्ये २ विशेष पोलीस अधिकारी आणि एक कर्मचारी यांचा समावेश आहे

गोकर्ण येथील श्री महाबळेश्‍वर मंदिर प्रशासनाने कह्यात घेतले !

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १९ सप्टेंबर या दिवशी उत्तर कन्नड जिल्हा प्रशासनाने गोकर्ण येथील श्री महाबळेश्‍वर मंदिर कह्यात घेतले. गेल्या १० वर्षांपासून हे मंदिर शिवमोग्गाचे श्री रामचंद्रपूर मठाच्या प्रशासनाच्या देखरेखीखाली आहे….

तरिकेरे (कर्नाटक) येथे धर्मांधांकडून श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

येथे १८ सप्टेंबरच्या दिवशी सालुमरदम्मा देवस्थानाजवळ विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्तीविसर्जन मिरवणूक चालू होती. ती कोडी कॅम्पजवळ असलेल्या हॉटेलकडे आल्यावर धर्मांधांनी त्यावर दगडफेक केली.

खटाव (जिल्हा सातारा) येथे श्री गणेशमूर्ती आणि मोहरमचा ताबूत एकाच मंडपात !

जातीभेदाच्या निर्मूलनासाठी आणि निधर्मी विचारांचा प्रसार करण्यासाठी श्री गणेशमूर्ती आणि मोहरमचा ताबूत एकाच मंडपात बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे श्री गणेशमूर्ती आणि ताबूत यांची एकत्रित आरती करण्यात येत आहे.

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि दैनिक देशोन्नतीचे मालक अन् संपादक यांना कायदेशीर नोटीस

सनातन संस्थेवर बिनबुडाचे आरोप करत तिची अपकीर्ती करणारे काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, तसेच या बिनबुडाच्या आरोपांना प्रसिद्धी देणारे दैनिक देशोन्नतीचे संपादक आणि प्रकाशक प्रकाश पोहरे…..

धर्मनिष्ठ हिंदू आणि अधिवक्ता संघटित झाल्यास हिंदूंना खर्‍या अर्थाने न्याय मिळेल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राची स्थापना हे दैवी कार्य आहे. अधिवक्ता कायदे जाणतात, तसेच त्याची मर्यादाही त्यांना ज्ञात असते. ते कायद्याच्या उपयुक्त शक्तीचा वापर करून हिंदूंना साहाय्य करू शकतात.

श्री गणेशमूर्तीला ‘सॅल्यूट’ केला म्हणून सैनिकांची चौकशी !

गणेशचतुर्थीच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ७ सैनिकांनी श्री गणेशमूर्तीला ‘गार्ड ऑफ ऑनर’ (विशिष्ट मान) देत ‘सॅल्यूट’ केला. सामाजिक प्रसारमाध्यमातून या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर कमांडट पीपी पॉली यांनी या सर्व सैनिकांच्या चौकशीचा आदेश दिला आहे.

उत्तराखंड राज्याने दिला गायीला ‘राष्ट्रमाते’चा दर्जा !

उत्तराखंड राज्याने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला असून असा दर्जा देणारे ते देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. याविषयीचे विधेयक उत्तराखंड विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. आता हे विधेयक संमतीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘भारत आणि पाक यांच्यात द्विपक्षीय चर्चा चालू व्हावी !’ – इम्रान खान

भारत आणि पाक यांच्यात द्विपक्षीय चर्चा चालू व्हावी, अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.

विश्‍व हिंदू परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त केरळ पूरग्रस्तांसाठी ५ सहस्र लोकांसाठी कपडे सुपुर्द !

विश्‍व हिंदू परिषदेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने येथील विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी ५ सहस्र लोकांना नवीन अंतर्वस्त्रे आणि कपडे श्री सिद्धगिरी मठाचे श्री अदृश्य काडसिद्धेश्‍वर स्वामी यांच्याकडे सूपुर्द केले.


Multi Language |Offline reading | PDF