पाकिस्तानकडून भारतीय सैनिकाची पुन्हा क्रूर अत्याचार करून हत्या

१८ सप्टेंबरला पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात घायाळ झालेल्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सीमेजवळ सापडला आहे. या सैनिकाचे डोळे काढण्यात आले होते, एक पाय, एक हातही तोडण्यात आला होता.

पोलिसांनो, कर्मफलन्यायानुसार सनातनचे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना नाहक छळण्याचे पाप तुम्हाला लागेल !

‘सध्या विविध अन्वेषण यंत्रणा डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणांचा तपास करत आहेत. या हत्यांच्या प्रकरणांत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा काडीमात्र संबंध नसतांना …..

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वैध मार्गाने केलेल्या विरोधानंतर ‘लव्हरात्री’ चित्रपटाचे शीर्षक ‘लवयात्री’ केले

अभिनेते सलमान खान यांनी निर्मिती केलेला ‘लवरात्री : यह कहानी है प्यार और मोहब्बत की’ असा शीर्षक असलेल्या चित्रपटाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वैध मार्गाने  प्रखर विरोध केला. याची नोंद घेऊन अखेर सलमान खान यांनी चित्रपटाचे नाव पालटून ते ‘लवयात्री : अ जर्नी ऑफ लव्ह’ असे ठेवले आहे.

तोंडी तलाक प्रकरणी अध्यादेशाला केंद्रीय मंत्रीमंडळाची संमती

तोंडी तलाकला गुन्हा ठरवणार्‍या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रीमंडळाने संमती दिली. या संदर्भातील विधेयक लोकसभेत संमत झाले होते; मात्र राज्यसभेत ते प्रलंबित आहे. विरोधी पक्षांना या विधेयकातील काही सूत्रांवर आक्षेप आहे.

सनातन संस्थेच्या वतीने ‘गोवन ऑब्झर्व्हर’चे संपादक, मालक आणि प्रकाशक यांना नोटीस

सनातन संस्थेविषयी विपर्यस्त लिखाण करणारे जॉनोसन ‘टी.ए.’ आणि हे लिखाण प्रकाशित करणारे ‘गोवन ऑब्झर्व्हर’ या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक राजन नारायण, प्रकाशक तारा नारायण, मालक गोवन ऑब्झर्व्हर प्रायव्हेट लिमिटेड ….

धर्मातील अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धा यांवर टीका करणे गुन्हा नाही ! – उच्च न्यायालय

हिंदु धर्मातील अनिष्ट रुढी, वर्णव्यवस्था, पुराणकथा, अंधश्रद्धा यांच्यावर फेसबूक किंवा इतर माध्यमातून टीका करणे, हा गुन्हा होत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने म्हटले आहे.

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन शास्त्रोक्त करण्याविषयीच्या प्रबोधन मोहिमेची ‘हेकेखोरपणा’ संबोधून हेटाळणी !

हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कशा पद्धतीने करावे, याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रतिवर्षी वैध मार्गाने प्रबोधन मोहीम राबवण्यात येते.

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘गणेशमूर्ती दान मोहीम’ नगरपालिका प्रशासनाने थांबवली !

येथील नगरपालिकेच्या वतीने जलप्रदूषणाचे कारण सांगून १७ सप्टेंबरला नगरपालिकेच्या वाहनांवरून सकाळी ७ वाजल्यापासून गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात येत होते.

गडहिंग्लज येथे अनेक भाविकांकडून नदीतील वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन !

येथे नगरपालिकेच्या वतीने गणेशमूर्ती दान मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पर्यावरणवाले, अंनिस आणि धर्मद्रोही लोक यांनी सहभाग घेतला होता; मात्र या मोहिमेकडे दुर्लक्ष करून अनेक भाविकांनी हिरण्यकेशी नदीच्या घाटावर वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

राज्यातील ४८ साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे ४०० कोटी रुपये थकवले

राज्यातील ४८ कारखानदारांनी नुकत्याच झालेल्या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची ४०० कोटी रुपयांची देणी थकवली आहेत. या कारखानदारांनी शेतकर्‍यांनी किमान आधारभूत किंमतही दिलेली नाही.


Multi Language |Offline reading | PDF