देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या घटली ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

लोकसंख्या वाढीचा दर पहाता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला न गेल्यास देशातील सामाजिक समरसता शेष रहाणार नाही आणि विकासही होणार नाही, अशी भीती केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केली.

मुंबई पोलिसांकडून गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण न करण्याचे गणेशभक्तांना आवाहन

गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘ट्विटर’ या सामाजिक माध्यमाद्वारे हिंदूंना आवाहन केले आहे. ‘प्रत्येक वेळी तुम्ही आवाज वाढवता. त्यामुळे जे शांततेत उत्सव साजरा करण्यासाठी प्रार्थना करत असतात

राममंदिर उभारत असाल, तर त्याच्या पायाभरणीचा दगड मी ठेवीन ! – बाबरचा वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी

तुम्ही राममंदिर बांधा. त्याविषयी आम्हाला कोणतीही अडचण नाही. जर राममंदिर उभारले जात असेल, तर त्याच्या पायाभरणीचा दगड मी स्वतः ठेवीन, असे प्रतिपादन बाबरचा वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी केले आहे

‘विजय मल्ल्या यांना कह्यात न घेता, भारतात आल्यावर आम्हाला गुपचूप माहिती द्या !’

विजय मल्ल्या यांना कह्यात घेण्याची आवश्यकता नाही; पण ते भारतात आल्यावर आम्हाला गुपचूप माहिती द्या, असा आदेश सीबीआयकडून मुंबई पोलिसांना पत्राद्वारे देण्यात आला होता, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

ब्रिटीश आस्थापन ‘ब्रुक बॉण्ड’च्या ‘रेड लेबल’ चहाच्या उत्पादनाच्या विज्ञापनातून हिंदूंना कट्टर, तर मुसलमानांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न

‘ब्रुक बॉण्ड’ या ब्रिटीश आस्थापनाचे ‘रेड लेबल’ हे चहाचे उत्पादन आहे. याचे विज्ञापन करतांना श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हिंदु ग्राहक आणि मुसलमान मूर्तीकार विक्रेता यांचे संभाषण दाखवण्यात आले आहे

पनवेल तालुक्यातील शाळा आणि शासकीय कार्यालये यांमध्ये देवतांच्या पूजाबंदीचा तुघलकी फतवा !

पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.एन्. तेटगुरे यांनी ५ सप्टेंबर या दिवशी परिपत्रक काढून शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये देवतांची पूजा आणि श्री सत्यनारायणपूजा करण्यास प्रतिबंध घालणारा फतवा काढला आहे.

कोल्हापूर येथे जनप्रबोधनानंतर असंख्य भाविकांकडून श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कुंडाऐवजी वहात्या पाण्यात !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबला येथील पंचगंगा घाटावर राबवलेल्या ‘आदर्श गणेशोत्सव मोहिमे’ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाविकांचे प्रबोधन केल्यानंतर ‘आम्ही गणेशमूर्ती दान न करता वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जन करणार आहे

मुंबईत गणेशोत्सवात लालबाग परिसरात १३५ भ्रमणध्वनी संच चोरीस

मुंबईत गणेशोत्सवात लालबाग परिसरात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी लागते. याच गर्दीचा लाभ घेऊन चोरट्यांनी गेल्या चार दिवसांत भाविकांचे १३५ भ्रमणध्वनी संच चोरीला गेले आहे.

भोरवासियांनी केले पारंपरिक पद्धतीने श्री गणेशमूर्ती विसर्जन !

प्रदूषणाच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या श्रद्धावर घाला घालणार्‍या अंनिसने श्री गणेशमूर्तीदान हा उपक्रम भोरमध्ये प्रारंभ करून महाराष्ट्रात राबवला. हिंदु जनजागृती समितीचे धर्मविषयक उपक्रम आणि भाविकांचा प्रतिसाद यांमुळे गेल्या काही वर्षांपासून भोरमधून अंनिसचा उपक्रम बंद पडला आहे.

मुंबई येथे टिश्यू पेपरपासून श्री गणेशमूर्तीची निर्मिती !

विर्ले-पार्ले येथील एका शिक्षकांनी पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली प्रत्येक गणेशोत्सवाच्या काळात किमान ८ ते १० टिश्यू पेपरपासून श्री गणेशमूर्ती सिद्ध करतात. त्यासाठी टिश्यू पेपर, झाडाचा डिंक, गुलाल आणि पाणी यांचा वापर करतात.


Multi Language |Offline reading | PDF