अमरावती येथे गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !

गणेशचतुर्थीला म्हणजे १३ सप्टेंबरला रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी शहरातील फ्रेजरपुरा परिसरातील आलमगीर चौक या ठिकाणी काही गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका एका मागून एक जात होत्या. त्या वेळी काही धर्मांध मुलांनी येऊन मिरवणुकीतील महिला आणि युवक यांना शिवीगाळ करणे चालू केले

तमिळनाडूत श्री गणेश मिरवणुकीवरील धर्मांधांच्या दगडफेकीत ३ पोलिसांसह ८ जण घायाळ

थिरुनेवेली शहराजवळील शेनकोत्ताई या गावात १३ सप्टेंबरच्या रात्री श्री गणेशमूर्तीची मिरवणूक मुसलमानबहुल भागातून जात असतांना धर्मांधांनी मार्ग पालटण्यास सांगितला. त्यानंतर त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे येथे हिंसाचार झाला.

इस्रोमधील हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांना विनाकारण अटक केल्याने ५० लाखांची भरपाई द्या ! – सर्वोच्च न्यायालयाचा केरळ पोलिसांना आदेश

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)मधील हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांना केरळ पोलिसांनी विनाकारण अटक करत मनस्ताप दिला, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले.

गणेश कपाळे यांना कह्यात घेतल्याचा धक्का सहन न झाल्याने वडील मधुकर कपाळे यांचा मृत्यू !

नालासोपारा कथित स्फोटकप्रकरणी गणेश कपाळे यांना कह्यात घेण्यात आल्यामुळे त्यांचे वडील मधुकर कपाळे (वय ६८ वर्षे) यांना हा धक्का सहन झाला नाही. त्यामुळे त्यांचा १४ सप्टेंबरला मृत्यू झाला, असे वृत्त महाराष्ट्र टाइम्सच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले होते.

(म्हणे) ‘ननवर बलात्कार झाला नाही !’- ‘मिशनरीज ऑफ जीझस’ने दावा करत पीडित ननचे छायाचित्र सार्वजनिक केले

मिशनरीज ऑफ जीझस’ने जालंधरचे बिशप फ्रॅन्को मुलक्कल यांचे समर्थन करत ‘ननवर बलात्कार झालेलाच नाही’, असा दावा केला आहे. मिशनरीजच्या चौकशी आयोगाने केलेल्या चौकशीनंतर हा दावा करण्यात आला आहे.

सनातनला होणारा विरोध, हे सनातनच्या धर्मकार्याला मिळालेले प्रशस्तीपत्रक !

सनातन संस्थेने समाजात जाऊन अध्यात्माचा प्रसार करतांना धर्मश्रद्धेचा प्रचार केला. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील नास्तिकतावादी विचारसरणीच्या संघटना आणि व्यक्ती यांचे धंदे बंद होऊ लागले. त्यामुळे आज ही मंडळी सनातन संस्थेला विरोध करत आहेत.

भारताच्या लोकशाही पद्धतीत त्रुटी ठेवणे, हे इंग्रजांचे मोठे षड्यंत्र ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

ब्रिटनमध्ये धर्माविषयीचे कायदे चर्चकडून बनवले जातात, तर राजकीय स्वरूपातील कायदे संसदेत बनवले जातात. अशी पद्धत भारतात का बनवण्यात आली नाही ? तसेच ब्रिटनमध्ये केवळ दोनच पक्ष आहेत, तर भारतात अनेक पक्ष आहेत.

ठाण्यात वहात्या पाण्यात गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करता यावे म्हणून पारसिक रेतीबंदर येथे महाघाट

गणपतीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून या सर्व कृत्रिम तलावांची महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. राजेंद्र अहिवर यांनी पाहणी केली.


Multi Language |Offline reading | PDF