भाजपने राममंदिर उभारले नाही, तर प्रभु श्रीराम जे करतील त्याचा आपण कधी विचार करू शकत नाही ! – साध्वी प्राची

आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो. आम्ही राममंदिराच्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाची वाट पहात आहोत. वर्ष २०१९ पर्यंत राममंदिर उभारले गेले पाहिजे. त्यासाठी वर्ष २०१९ च्या निवडणुकाही टाळल्या जाऊ शकतात.

(म्हणे) ‘केरळमधील मंदिरांची संपत्ती विकून ती रक्कम पूरग्रस्तांना द्या !’ – भाजपचे खासदार डॉ. उदित राज

केरळच्या पद्मनाभ, शबरीमला आणि गुरुवायुर मंदिरांतील सोने आणि संपत्ती विकली, तर केरळमधील पूरग्रस्तांना साहाय्यासांठी आवश्यक २१ सहस्र कोटी रुपयांपेक्षा ५ पट अधिक पैसे जमा होतील. जनतेने रस्त्यावर उतरून यासाठी मागणी केली पाहिजे…..

गुरुग्राम (हरियाणा)मध्ये ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदीला नगरपालिका टाळे ठोकणार

गेल्या आठवड्यापासून येथील शीतला कॉलनीमध्ये असणार्‍या मशिदीवरील भोंग्यामुळे चालू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेने या मशिदीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

पाक आणि चीन यांच्या तुलनेत भारताकडे अपुरा शस्त्रसाठा ! – वायूदलप्रमुख बी.एस्. धनोआ

जगात भारताला भेडसावणार्‍या समस्यांप्रमाणेच समस्या असणारे देश खूप अल्प आहेत. आपल्या दोन्ही बाजूला अण्वस्त्रधारी देश (पाक आणि चीन) आहेत. त्या तुलनेत आपल्याकडील शस्त्रसाठा अपुरा आहे.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील मंदिरात होणार्‍या कव्वालीला हिंदु युवा वाहिनीचा विरोध

येथील दनकौरमधील द्रोण मंदिरातील श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्तच्या मेळ्यामध्ये आयोजित होणार्‍या कव्वालीला हिंदु युवा वाहिनीने विरोध केला आहे. वाहिनीच्या विरोधामुळे स्थानिक प्रशासनाने यावर बंदी घातली आहे.

‘लवरात्री’ चित्रपटाच्या प्रकरणी सलमान खान यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा आदेश

येथील स्थानिक न्यायालयाने ‘अभिनेते सलमान खान यांची निर्मिती असणारा हिंदी चित्रपट ‘लवरात्री’ यामधून हिंदूंच्या भावना दुखावण्यात आल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा’, असा आदेश पोलिसांना दिला आहे. 

(म्हणे) ‘मध्यप्रदेशात काँग्रेस सत्तेत आली, तर ‘रामपथ’ आणि ‘नर्मदा परिक्रमा पथ’ बनवील !’ – काँग्रेस

मध्यप्रदेशमध्ये यावर्षी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ‘काँग्रेस सत्तेत आल्यास ‘रामपथ’ आणि ‘नर्मदा परिक्रमा पथ’ यांची उभारणी करील’, असे आश्‍वासन पत्रकार परिषदेत दिले.


Multi Language |Offline reading | PDF