आज श्री गणेशचतुर्थी

आज श्री गणेशचतुर्थी : वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आणि वितरक यांच्यावर श्री गणेशाची अखंड कृपादृष्टी राहो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना !

सनातन संस्थेने विरोधकांकडे दुर्लक्ष करून कार्य करत रहावे ! – केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक

सनातनने विरोधकांच्या कृतीकडे दुर्लक्ष करून कार्य करत रहावे. विरोधक सनातनचे काही बिघडवू शकत नाहीत. स्वत: काहीच चांगले करायचे नाही आणि इतरांनाही चांगले करू द्यायचे नाही, अशी या विरोधकांची वृत्ती आहे.

नक्षलप्रेमींच्या नजरकैदेत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ

पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या ५ नक्षलप्रेमींच्या नजरकैदेत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला होणार आहे.

‘आशु महाराज’ बनून आसिफ खान याच्याकडून लैंगिक शोषण

अनेक वर्तमानपत्रांत आणि वृत्तवाहिन्यांवरून ज्योतिष सांगणारा तथाकथित ‘ज्योतिषाचार्य आणि हस्तरेखा विशेषज्ञ’ आशु महाराज हा आसिफ खान असून त्याने येथील एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे

चीनकडून ऑगस्टमध्ये ३ वेळा उत्तराखंड येथे घुसखोरी केल्याचे उघड

चीनच्या सैन्याने ऑगस्ट मासामध्ये ३ वेळा भारतात घुसखोरी केल्याची माहिती इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या अहवालात देण्यात आली आहे. ‘तिन्ही वेळेला भारतीय सैनिकांनी केलेल्या विरोधानंतर चीनचे सैनिक माघारी गेले’,

पैसे घेऊनही काम न करणार्‍या मंत्रालयातील अधिकार्‍याला मारहाण !

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयातील अधिकार्‍याने पैसे घेऊनही काम न केल्याने, त्यांना धाराशिव येथील अरुण निटुरे यांनी मंत्रालयात जाऊन  मारहाण केली.

चर्चमध्ये अनेक ननचे लैंगिक शोषण; मात्र भीतीपोटी त्या अद्याप गप्प आहेत !

पंजाबमधील जालंधरचे बिशप फ्रॅन्को मुलक्कल यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणार्‍या केरळमधील ननने ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप यांना ८ सप्टेंबर या दिवशी ७ पानी पत्र लिहिले आहे.

पंतप्रधान कार्यालयाला मोठ्या घोटाळेबाजांची सूची पाठवूनही त्यांच्यावर कारवाई नाही ! – रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन

जेव्हा मी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होतो, तेव्हा बँकेने फसवणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी एक विभाग बनवला होता. या माध्यमातून अन्वेषण करणार्‍या संस्थेला फसवणुकीच्या प्रकरणांची माहिती उपलब्ध करता येईल, हा यामागचा हेतू होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now