इंधन दरवाढ सरकारमुळे नाही, तर आंतरराष्ट्रीय कारणांमुळे ! – भाजप सरकार

इंधनाचे वाढते दर सरकारच्या हातात नाहीत, तर आंतरराष्ट्रीय कारणांमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. कच्च्या तेलाचे भडकलेले भाव याला कारणीभूत आहेत. आमच्या सरकारने महागाई न्यून करण्याचा कायमच प्रयत्न केला आहे.

इंधन दरवाढीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन का ? – राहुल गांधी

इंधनाचे दर सतत वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर मौन का बाळगून आहेत, असा प्रश्‍न काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

श्रीलंकेतील हिंदूंवर बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्याकडून आक्रमणे ! – सच्चिदानंदन्, संस्थापक, शिवसेनाई संघटना, श्रीलंका

श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ, तसेच हिंदु समाज आणि मंदिरे यांचे रक्षण करणार्‍या शिवसेनाई संघटनेचे संस्थापक आणि ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. मरवनपुलावु सच्चिदानंदन् हे ८ सप्टेंबरपासून शिकागो येथे चालू झालेल्या विश्‍व हिंदू संमेलनाच्या ‘राजकीय हिंदु’ या सत्रात सहभागी झाले होते.

(म्हणे) ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यासाठी न्यायालयाकडून जरी अनुमती आणली, तरी सर्वांवर चॅप्टर खटला प्रविष्ट करणार !’

‘एका शहरात हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलनाची अनुमती मागण्यासाठी नुकताच अर्ज देण्यात आला होता. हा अर्ज प्रविष्ट करून न घेता संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्‍यांनी तो फेटाळला.

भाग्यनगर येथील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात दोघांना फाशी, तर एकाला जन्मठेप

येथे वर्ष २००७ मध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनचे आतंकवादी अनीक शफीक सईद आणि इस्माइल चौधरी यांना फाशीची, तर तारिक अंजुम याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य हेच खरे साहाय्य ! – कृष्ण मंडावा

८ ते १० सप्टेंबर २०१८ या कालावधीत साऊथ कॅरोलिना, अमेरिका येथे संपन्न झालेल्या ‘ज्ञान, साहित्य आणि संस्कृती’ या विषयावरील ७ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’

सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा निषेध !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ सप्टेंबर या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या आंदोलनामध्ये सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा आणि नक्षलवाद्यांच्या समर्थकांना विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आदी म्हणणार्‍यांचाही निषेध करण्यात आला.

कोल्हापूर येथे गणेशोत्सव विसर्जन मोहिमेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांना पूर्ण सहकार्य करू ! – आमदार राजेश क्षीरसागर

यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मोहिमेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था येथील पंचगंगा घाटावर राबवणार असलेल्या उपक्रमांना पूर्ण सहकार्य करू, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी येथे दिले.

सनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही ! – सुरेश हाळवणकर, आमदार, भाजप

‘सनातन बंदीचा विषय मला पूर्ण ठाऊक आहे. सनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही. सनातन बंदीच्या विरोधात मी आवाज उठवीन’, असे आश्‍वासन येथील भाजपचे आमदार श्री. सुरेश हाळवणकर यांनी ८ सप्टेंबरला येथे दिले.


Multi Language |Offline reading | PDF