केरळमधील काँग्रेसच्या ख्रिस्ती आमदाराकडून बिशपने बलात्कार केलेल्या ननचा ‘वेश्या’ म्हणून उल्लेख !

एका ननने सध्या पंजाबमधील जालंधर येथे कार्यरत असलेले बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार केली आहे आणि त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्या न्यायालयातही जाणार आहेत.

राममंदिर नक्की होणार; कारण सर्वोच्च न्यायालय आमचे आहे ! – भाजपचे आमदार मुकुटबिहारी वर्मा

भाजपने विकासाच्या सूत्रावर निवडणूक जिंकली आहे; पण राममंदिर नक्कीच बनेल; कारण आम्ही राममंदिराविषयी कटीबद्ध आहोत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय आमचे आहे,

‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा भारतीय समाजाच्या फाळणीचे कारण ठरेल ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

केंद्र सरकारने ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे भारतीय समाजात फाळणी होईल, असे प्रतिपादन द्वारका आणि ज्योतिष पीठाचे  शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केले.

जम्मू-काश्मीरमध्ये ‘३५-अ’ कलम लावणे म्हणजे भारतात इस्लामी राज्य स्थापण्याचा कट ! – ‘इक्कजूट्ट जम्मू’ संघटना

भारतीय घटनेतील कलम ‘३५-अ’ हे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील कराराचा एक भाग आहे, असा फुटीरतावाद्यांचा दावा खोडून काढून तो नाकारण्यास भारत  सरकार अयशस्वी ठरले. त्यामुळेच जम्मू आणि काश्मीर राज्याला कलम ३७० लावल्यानंतर कलम ‘३५-अ’ हे ….

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी जळगाव येथून दोघांना अटक

नालासोपारा येथे कथित शस्त्रसाठा सापडल्याच्या प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाने येथील साकली गावातील दोघांना अटक केली आहे. वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी अशी या दोघांची नावे आहेत.

मुसलमान स्वतःला असुरक्षित समजतात; कारण त्यांना ठाऊक आहे की, ते ‘जिहादी’ आहेत ! – केंद्रीयमंत्री बाबूल सुप्रियो

हे खरे आहे की, मुसलमान स्वतःला असुरक्षित समजत असतात; कारण त्यांना ठाऊक आहे की, ते जिहादी आहेत. मी तुम्हाला बंगालविषयी सांगत आहे, असे विधान केंद्रीयमंत्री बाबूल सुप्रियो यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीवरील चर्चासत्राच्या वेळी केले.

(म्हणे) ‘श्री गणेशाला नैवेद्य अर्पण करण्यापेक्षा गरजूंना वह्या आणि लेखणी अर्पण करा !’

गणपतीला फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करण्याऐवजी झोपडपट्टीतील गरजूंना वाटता येण्यासाठी वह्या अर्पण करा !, असे धर्मद्रोही आवाहन करणारा संदेश गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक प्रसारमाध्यमांत फिरत आहे

(म्हणे) ‘कोण कुत्रा आणि कोण वाघ, हे सरसंघचालकांनी स्पष्ट करावे !’ – असदुद्दीन ओवैसी

सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘कोण कुत्रा आणि कोण वाघ?’ याचे उत्तर दिले पाहिजे, असा प्रश्‍न एम्आएम्चे अध्यक्ष आणि खासदार अससुद्दीन ओवैसी यांनी विचारला आहे. शिकागो येथील दुसर्‍या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मकार्यासाठी घेतलेले सतीचे वाण ‘व्रत’ म्हणून स्वीकारूया ! – भागवताचार्य वा.ना. उत्पात

हिंदु धर्म तर्कशुद्ध भाषेत मांडणारे एकमेव वृत्तपत्र म्हणजे ‘दैनिक सनातन प्रभात’ ! मराठी वृत्तपत्र क्षेत्रात दैनिक सनातन प्रभातमध्येच सत्याची बाजू मांडली जाते आणि त्यातूनच सत्यदर्शन घडते. सध्या चालू असलेल्या अपप्रचाराच्या वादळी वातावरणात केवळ ‘सनातन’चा दिवाच तेवत आहे.

अंनिस, तत्सम संघटना आणि पुरोगामी यांच्याकडून साजर्‍या केलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोन दिनानिमित्त करण्यात आलेली टीका अन् त्यांचे खंडण

२० ऑगस्ट या दिवशी अंनिस आणि तत्सम संघटना, तसेच पुरोगामी यांच्याकडून वैज्ञानिक दृष्टीकोन दिन साजरा करण्यात आला. त्याच पार्श्‍वभूमीवर १९ ऑगस्ट या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF