हिंदूंनो, संघटित होऊन कार्य करा ! – सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

वाघ एकटा असला, तर जंगली कुत्रेही त्याला घेरून हरवू शकतात. त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन कार्य केले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

या वर्षी कृत्रिम हौद बांधणार नाही ! – यवतमाळ येथील समर्थ मंडळाच्या अध्यक्षांचे आश्‍वासन

या वर्षी कृत्रिम हौद बांधणार नाही, तर मातीच्या मूर्ती सिद्ध करणार्‍या मूर्तीकारांना पारितोषिके देणार आणि सार्वजनिक गणेशोत्सवात अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करणार, असे आश्‍वासन येथील समर्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. कशाळकर यांनी येथील हिंदु जनजागृती समितीला दिले.

घाटकोपर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनास पोलिसांनी अनुमती नाकारली !

नालासोपारा स्फोटक प्रकरणानंतर ‘सनातन संस्थेवर बंदी घाला’, या होत असलेल्या उथळ मागणीच्या निषेधार्थ ८ सप्टेंबर घाटकोपर येथे होणार्‍या राष्ट्रीय हिंदु आंदोलनास पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करून अनुमती नाकारली.

संभाजीनगरमध्ये हिंदु-मुसलमान दंगल !

७ सप्टेंबर या दिवशी बुढीलेन या भागात रात्री ११ वाजता हिंदु महिलेला रिक्शाचालकाचा धक्का लागल्यावर त्याचा जाब विचारला म्हणून धर्मांधांनी संतप्त होऊन मारहाण करणे चालू केले आणि परिणामी दंगल उसळली.

नालासोपारा येथील जनसंवाद सभेच्या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्वनिष्ठांना १४९ ची नोटीस !

गोरक्षक श्री. वैभव राऊत यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ यांवरील बेछूट आरोप आणि त्यांची अपकीर्ती यांविरोधात नालासोपारा येथे स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर जनसंवाद सभेच्या …..

श्री गणेशोत्सवाच्या कालावधीत साजर्‍या होणार्‍या व्रतांचे उपासनाशास्त्र

निष्काम भावनेने धर्माचरण करणे यालाच ‘कर्मयोग’ म्हणतात. सकाम भक्तीची आपल्या धर्माला अपेक्षाच नाही; परंतु पुढील कालप्रवाहात मानवाची ही धर्माविषयीची मूळ धारणा नष्ट झाल्यामुळे त्याच्या धर्माचरणात दिवसेंदिवस उणीव येत गेली आणि तेथेच व्रतांची निर्मिती झाली.

अमेरिकेत बँकेमधील गोळीबारात एका भारतियासह तिघांचा मृत्यू

सिनसिनाटी शहरातील एका बँकेत एका बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात पृथ्वीराज कांदेपी या भारतीय तरुणासह अन्य २ जणांचा मृत्यू झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे.

फटाके वाजवून पैसे जाळणे हा समाजद्रोह, राष्ट्रद्रोह आणि धर्मद्रोह

‘राष्ट्र आणि धर्म संकटात आहे. केरळमध्ये पुराने थैमान घातले आहे. तर महाराष्ट्रातील काही भाग दुष्काळग्रस्त आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. असे असतांना फटाके वाजवून पैसे जाळणे हा समाजद्रोह, राष्ट्रद्रोह आणि धर्मद्रोह आहे !’

उत्सवकाळात शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह !

‘श्री गणेशमूर्तींचे ‘मंगलमूर्ती मोरया’ या गजरात विसर्जन करतांना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते.

आर्थिकदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या होणारी हानी

महाराष्ट्रातील आजची फटाक्यांची उलाढाल सहजच १०० कोटी रुपयांहून अधिक आणि भारतभरातील सहस्रो कोटी रुपये असेल ! सणांचा आनंद साजरा करण्यासाठी कोट्यवधींच्या रुपयांच्या फटाक्यांचा धूर हवेत सोडणे, हे उचित आहे का ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now