सनातन संस्थेवरील बंदीचे षड्यंत्र हाणून पाडू ! – लोकेंद्रसिंहजी कालवी, संस्थापक, करणी सेना

सनातन संस्था ही खूप चांगली संस्था असून चांगल्या उद्देशाने कार्यरत आहे. ज्या संस्थेचे साधक सामाजिक आणि धार्मिक अंगाने, तसेच सहिष्णुता राखून कार्य करतात, अशा सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, हा मोठा मूर्खपणा आहे.

मार्च २०२० पर्यंत कोणताही पक्ष, व्यक्ती आणि संस्था राममंदिर उभारू शकत नाही ! – ज्योतिषी आचार्य राजीव नारायण शर्मा यांचे भाकीत

मार्च २०२० पूर्वी अयोध्येत कुणीही कितीही प्रयत्न केले, तरी कोणताही पक्ष, व्यक्ती किंवा संस्था यांना राममंदिर उभारता येणार नाही, असे ज्योतिषी आचार्य राजीव नारायण शर्मा यांनी भाकित केले आहे.

जातीद्वेष पसरवणारी वक्तव्ये पुन्हा केल्यास ब्राह्मण महासंघ आक्रमक पवित्रा घेणार !

‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवर झालेल्या एका चर्चेत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांना उद्देशून ‘भटुकड्यांनो, मनुवाद्यांनो, हरामखोरांनो’ असे जातीय विद्वेष पसरवणारे अवमानास्पद शब्द वापरले.

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे पुजार्‍याची हत्या

येथील मिठनपूर आणि चमरौला यांच्यामध्ये असणार्‍या जंगलातील एका मंदिरातील ६५ वर्षीय पुजारी मुन्नालाल यांची अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हत्या केली. गेल्या अनेक वर्षांपासून ते मंदिरात पूजा करत होते. येथे गेल्या वर्षी रहाण्याची व्यवस्था करण्यात आल्यावर ते तेथे राहू लागले होते.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आता अटक केलेले आरोपी तरी नक्की हत्येचे आरोपी आहेत ना ? – मुंबई उच्च न्यायालय

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आता अटक केलेले आरोपी तरी नक्की हत्येचे आरोपी आहेत ना ? याची निश्‍चिती करून घ्या अन्यथा खरे आरोपी मोकाटच रहातील, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने ६ सप्टेंबर या दिवशी अन्वेषण यंत्रणेला खडसावले.

(म्हणे) ‘सीमेवरील सैनिकांच्या बलीदानाचा सूड घेणार !’ – पाकचे सैन्यदलप्रमुख कमर जावेद बाजवा

सीमेवरही सैनिकांनी देशासाठी रक्त सांडले आहे. त्यांचे बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्वांचा सूड घेऊ, अशी धमकी पाकचे सैन्यदलप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारताचे नाव न घेता दिली आहे.

नक्षलवाद्यांचे समर्थन केल्यावरून पुरो(अधो)गामी अभिनेते गिरीश कर्नाड यांच्या विरोधात तक्रार

पुरो(अधो)गामी लेखक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांच्या विरोधात येथील उच्च न्यायालयातील अधिवक्ता तथा हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.

प्रसारमाध्यमांचा उन्माद !

१० ऑगस्टला हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. वैभव राऊत, शिवप्रेमी श्री. सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर यांना मुंबई आतंकवादविरोधी पथकाने (‘एटीएस्’ने) अटक केली.

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी युवकांनी योगदान द्यावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

देशात बहुसंख्य हिंदू आहेत, तसेच देशातील महत्त्वाच्या पदांवरही बहुसंख्य हिंदू असूनही हे हिंदु राष्ट्र घोषित होत नाही. जन्माने बहुसंख्य असूनही हिंदुत्वाचा विचार करणारे अल्प आहेत. भ्रष्टाचार, बेरोजगारी, बलात्कार आदींच्या वाढत्या प्रमाणामुळे लोकशाही निरर्थक ठरली आहे.


Multi Language |Offline reading | PDF