अन्वेषण यंत्रणेतील अधिकार्‍यांनी माध्यमांसमोर पुरावे उघड करणे योग्य नाही !

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात ६ सप्टेंबर या दिवशी सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालयाने अन्वेषण यंत्रणेतील अधिकार्‍यांना फटकारले आहे. या हत्येच्या संबंधी सतत माध्यमांसमोर पुरावे उघड करणे आम्हाला पसंत नाही.

समलैंगिक संबंध गुन्हा नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत. त्यामुळे २ सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगी गोष्ट असल्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ६ सप्टेंबरला दिला.

धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणाला विरोध म्हणून हिंदुत्वनिष्ठांकडून नागपूर महापालिकेतील देवतांच्या प्रतिमा बाहेर काढून निदर्शने !

येथील महानगरपालिकेच्या वतीने शहरातील धार्मिकस्थळांचे अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला आहे. हिंदुत्वनिष्ठांनी ५ सप्टेंबरला महानगरपालिकेतील पदाधिकारी ……

सनातन संस्थेवर बंदी येणार नाही ! – मदनभाऊ येरावार, पालकमंत्री, यवतमाळ

येथील पालकमंत्री आणि भाजपचे नेते श्री. मदनभाऊ येरावार यांना सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी ‘सनातन संस्थेवर बंदी येणार नाही’, अशा शब्दांत कार्यकर्त्यांना आश्‍वस्त केले.

हिंदु महिला आणि पुजारी यांचा अवमान करणार्‍या पुस्तकावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

हिंदु महिला आणि मंदिरातील पुजारी (ब्राह्मण) यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण असणारे मल्ल्याळी लेखक एस्. हरिश यांच्या ‘मिशा’ (मिशी) नावाच्या पुस्तकावर बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

अ‍ॅट्रॉसिटीतील सुधारणांच्या विरोधात सवर्णांचे भारत बंद आंदोलन

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात अनुसूचित जातींच्या बाजूने सुधारणा करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नाच्या विरोधात ६ सप्टेंबरला सवर्णांच्या संघटनांनी भारत बंद आंदोलन केले.

(म्हणे) ‘आठवले याची बिल्डिंग (सनातन आश्रम) साडेतीन मिनिटांत तोडून टाकू !’

आठवल्याची (सनातनचे संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) बिल्डिंग (सनातन आश्रम) साडेतीन मिनिटांत तोडून टाकू, अशी जाहीरपणे धमकी (कु)विचारवंत लक्ष्मण माने यांनी भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन महामेळाव्यात दिली.

भारतातील ४२ कोटी लोक आळशी ! – जागतिक आरोग्य संघटना

भारतातील ३५ टक्क्यांहून अधिक म्हणजे ४२ कोटी हून अधिक लोक आळशी आहेत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. शारीरिक कृती टाळण्यामुळे या लोकांना हृदयरोगासह कर्करोग, मधुमेह आणि……

आरोग्यमंत्री आणि पोलीस अधिकारी यांच्या घरांवर सीबीआयची धाड

मद्रास उच्च न्यायालयाने ३ मासांपूर्वी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) कोट्यवधी रुपयांच्या गुटखा घोटाळ्याच्या प्रकरणी ४० ठिकाणी धाडी घातल्या.


Multi Language |Offline reading | PDF