आरोप सिद्ध झाल्याविना सनातन संस्थेवर कारवाई नाही ! – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांचा पुनरुच्चार

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्था सहभागी असल्याचे सिद्ध झाले पाहिजे. याविषयी आणखी अन्वेषण झाले पाहिजे. योग्य पुरावे असल्याविना सनातन संस्थेवर बंदी घालणे शक्य नाही. आरोप सिद्ध होईपर्यंत वाट पहाणे अनिवार्य आहे

सनातन संस्थेचे निर्दोषत्व लवकरच सिद्ध होणार ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

डॉ. दाभोलकर यांच्यासह अन्य पुरोगामी मंडळींच्या झालेल्या हत्यांशी संबंध जोडून काही हिंदुद्वेष्टी मंडळी आणि काही राजकीय पक्ष सनातन संस्थेला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. पकडण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांपैकी एकही सनातन संस्थेचा साधक नाही.

टीपू सुलतान संघर्ष समितीच्या विरोधामुळे पोलिसांकडून बेळगाव येथील हिंदु जनजागृती समितीचा मोर्चा रहित

सनातनवरील संभाव्य बंदीच्या षड्यंत्राच्या विरोधात, तसेच हिंदुत्वनिष्ठांवरील केलेल्या अन्याय्य कारवाईच्या विरोधात १ सप्टेंबर या दिवशी शहरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुरोगामी म्हणवणारे ‘डॉ. दाभोलकर हत्येचा खटला’ का चालवू देत नाहीत ? – राहुल कौल, युथ फॉर पनून कश्मीर, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे षड्यंत्र ५ वर्षांनंतर पुन्हा नव्याने चालू झाले आहे. या ५ वर्षांत खरे मारेकरी का सापडले नाहीत, याचे उत्तर द्या. मारेकरी सापडले न गेल्यानेच प्रत्येक वेळी धर्म आणि राष्ट्र यांना सर्वश्रेष्ठ मानणारी सनातन संस्था …….

टी.व्ही. ९ वृत्तवाहिनी, तिचे मुख्य संपादक, संचालक आणि निवेदक यांना सनातन संस्थेकडून कायदेशीर नोटीस

३० ऑगस्ट या दिवशी ‘टीव्ही ९’ मराठी वृत्तवाहिनीने ‘‘तो’ महाराष्ट्रातून एम्पीला पळून जाणार ?’ या शीर्षकाखाली धादांत खोटे वृत्त प्रसारित करून सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी टी.व्ही. ९ मीडिया महाराष्ट्र…….

सनातन सत्यदर्शन विशेषांक !

नालासोपारा प्रकरणानंतर पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे यांनी सनातन संस्थेला अन् हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य केले आहे. या संदर्भात सनातनची सत्य बाजू मात्र ऐकून किंवा समजून घेतली जात नाही. सनातनची सत्य बाजू समाजासमोर यावी, या उद्देशाने सनातन संस्था न्यासाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध करत आहोत !

एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींकडून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात घुसून चित्रीकरण करत खोट्या वृत्ताचे प्रसारण !

एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर आणि कॅमेरामन नीलेश यांनी २३ ऑगस्ट या दिवशी कोणतीही अनुमती न घेता येथील सनातनच्या आश्रमात घुसून आश्रमाचे चित्रीकरण केले.

साधकांनो, आश्रम, सेवाकेंद्र किंवा निवासस्थान येथे येणार्‍या अनोळखी व्यक्तींविषयी सतर्कता बाळगा !

सनातन संस्थेचे विरोधक सनातन संस्था आणि संस्थेचे साधक यांच्यावर अवैध कारवायांत गुंतलेली अथवा राष्ट्रविरोधी संघटना असा ठपका ठेवून संस्थेवर बंदी घालण्याचा खटाटोप करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF