मोदी सरकार उलथवून लावण्याचा माओवाद्यांचा कट होता ! – अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह

नक्षलींशी संबंध असल्यामुळे पुणे पोलिसांनी २९ ऑगस्टला देशभर ९ ठिकाणी धाडी घालून ५ जणांना अटक केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटक न करता घरीच नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह उभे करण्यात आले.

कटासाठी शहरी नक्षलवाद्यांनी म्यानमारमध्ये घेतली होती बैठक !

नक्षलवाद्यांच्या नेत्यांनी नुकतीच म्यानमारमध्ये बैठक आयोजित केली होती आणि त्यात बंदी घालण्यात आलेल्या संघटनांसह जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी संघटनांचे नेते सहभागी झाले होते, अशी माहिती समोर आली आहे.

सनातन संस्थेवर बंदी घालू देणार नाही ! – उद्योगपती रवि कामत

सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेला खोट्या आरोपात अडकवून तिच्यावर बंदी घालणे, हे समाज कधीच खपवून घेणार नाही, अशी चेतावणी उद्योगपती श्री. रवि कामत यांनी येथे ‘समस्त हिंदु ऐक्या’ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीच्या विरोधात निषेधमोर्चा

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीविरुद्ध ३० ऑगस्ट या दिवशी हुब्बळ्ळी येथे निषेधमोर्चा काढण्यात आला. शहरातील दाजिबान पेठेतील श्री दुर्गादेवी मंदिरापासून प्रारंभ झालेल्या या मोर्च्याची सांगता तहसीलदार कार्यालयानजीक झाली.

ब्रिटनच्या लीथ शहरात गुरुद्वारा जाळण्याचा प्रयत्न

स्कॉटलॅण्डमधील लीथ शहरातील गुरुद्वारा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी ४९ वर्षांच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी स्वतःला हिंदु घोषित केल्यावरच ते कैलास मानसरोवरपर्यंत जाऊ शकतात ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

राहुल गांधी ३१ ऑगस्ट या दिवशी १२ दिवसांच्या कैलास मानसरोवर यात्रेसाठी मार्गस्थ झाले.

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर कठोर कारवाई करा !’

सनातन संस्थेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन येथील टीपू सुलतान संघर्ष समितीकडून जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. ‘बेळगाव येथे सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्‍या देशद्रोही कार्यक्रमांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करावी.

महिलेने सुडापोटी बलात्काराचे आरोप केल्याचे उघड !

एका महिलेवरील बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या २ जणांची सर्वोच्च न्यायालयाकडून तब्बल २८ वर्षांनी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

माओवाद्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट होता ! – पुणे पोलिसांची न्यायालयात धक्कादायक माहिती

कह्यात घेण्यात आलेल्या माओवादी समर्थक नेत्यांना २९ ऑगस्टला पोलिसांनी पुणे न्यायालयात उपस्थित केले आणि सर्वांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. या वेळी पोलिसांनी माहिती देतांना सांगितले की, माओवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता.

५०० आणि २ सहस्र रुपये मूल्यांच्या बनावट नोटांमध्ये प्रचंड वाढ ! – रिझर्व्ह बँक

नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या ५०० आणि २ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा बनवण्यात आल्या आहेत. तसेच त्यात मोठी वाढही झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF