तत्कालीन काँग्रेस सरकारने स्वस्तातील विमाने अधिक मूल्याची दाखवून खरेदी केली ! – लेखापरीक्षक

वर्ष २००९ मध्ये म्हणजेच काँग्रेस सरकारच्या काळात ‘बोईंग’ या अमेरिकेतील आस्थापनाकडून खरेदी करण्यात आलेल्या ‘पी ८-आय’ या पाणबुडीविरोधी विमानांच्या खरेदी व्यवहारावर लेखापरीक्षकांनी (कॅगने) प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

देहलीमध्ये प्रदूषणामुळे गेल्या ५ वर्षांत ९८१ जणांचा मृत्यू, तर १७ लाख लोक आजारी

देहलीमध्ये वर्ष २०१३ ते २०१७ या कालावधीत प्रदूषणामुळे झालेल्या ‘अ‍ॅक्यूट रेस्परेटरी इन्फेक्शन’(एआर्आय)मुळे ९८१ लोकांचा मृत्यू झाला आणि १७ लाख लोक आजारी झाले, अशी माहिती संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालात देण्यात आली आहे.

बोधगया येथे बॉम्बस्फोटाचा कट रचणार्‍या बांगलादेशी आतंकवाद्याला अटक

जानेवारी २०१८ मध्ये बोधगया येथे बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश’ या आतंकवादी संघटनेच्या ३ आतंकवाद्यांना अटक केली आहे.

येत्या उत्सवकाळात रस्त्यावर एकजरी अनधिकृत मंडप उभारला गेला, तर पालिकाप्रमुखांवर कारवाई होणार ! – मुंबई उच्च न्यायालय

रस्ते आणि पदपथ यांची अडवणूक करणार्‍या, वाहतुकीची कोंडी करणार्‍या अनधिकृत उत्सव मंडपांवर कारवाई करण्यात पालिका, तसेच अन्य यंत्रणा यांनी आतापर्यंत टाळाटाळच केलेली आहे. येत्या उत्सव काळात रस्ता किंवा पदपथ यांवर एकजरी ……

चेंबूर (मुंबई) येथील भारत पेट्रोलियमच्या प्लान्टमध्ये भीषण आग

चेंबूर येथील माहुल परिसरात असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल्) आस्थापनामध्ये हायड्रो क्रॅकर कॉम्प्रेसर प्लान्टमध्ये ८ ऑगस्टला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्फोटामुळे…….

हिंदूंच्याच सण-उत्सवांत न्यायालय, प्रशासन आणि राज्यकर्ते यांचे अडथळे येत असतील, तर या देशाचे भविष्य काय ? – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूजा आणि दुर्गामूर्तीची मिरवणूक यांत कायदेशीर अडथळे आणले; म्हणून ज्यांनी शिमगा केला, त्यांचे राज्य आज महाराष्ट्रात आहे. ममता बॅनर्जी यांना तेव्हा देशद्रोही, हिंदुद्रोही ठरवून राजकीय तांडव करणार्‍यांनी…..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज ‘महाराष्ट्र बंद’ !

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनाच्या दिवशी राज्यभरात मराठा समाजाने ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली आहे; मात्र या बंदमध्ये मुंबई आणि ठाणे यांचा समावेश नाही.

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची पोलीस कोठडीत मारहाण झाल्याची न्यायालयात तक्रार

बेंगळूरू न्यायालयाने गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी २ आरोपी अमित बद्दी आणि गणेश मिस्कीन यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now