देशातील प्रत्येक भागात बलात्कार होत आहेत ! – सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

देशभरात असे का होत आहे ? उजवीकडे, डावीकडे, मधे अशा देशातील प्रत्येक भागात बलात्कार होत आहेत, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बलात्काराचे …….

द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे (द्रमुकचे) प्रमुख आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम्. करुणानिधी यांचे निधन

द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे (द्रमुकचे) प्रमुख आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम्. करुणानिधी यांचे ७ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते.

आतंकवाद्यांवरील कारवाईत १ मेजर आणि ३ सैनिक हुतात्मा, तर ४ आतंकवादी ठार

काश्मीरच्या गुरेज भागातील सीमेवरून होणारी आतंकवाद्यांची घुसखोरी रोखतांना सैन्याचे १ मेजर आणि ३ सैनिक हुतात्मा झाले, तसेच ४ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील होते.

भगवान परशुराम यांची कृपा लाभलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उच्चकोटीचा भाव असलेल्या म्हापसा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी (वय ८१ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान !

भगवान परशुराम यांची कृपा लाभलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उच्चकोटीचा भाव असलेल्या म्हापसा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी या…..

प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना आंदोलन चुकीचे ! – उच्च न्यायालय

प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना आंदोलन करणे चुकीचे आहे. जिवाची किंमत ही आंदोलनापेक्षाही अधिक असून कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. सर्वांनी शांतता राखावी, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई येथे काही मूर्तीकारांकडून सूर्यफुलाची बी असलेल्या तथाकथित पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती !

धारावी आणि परळ येथे काही मूर्तीकार पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली विघटन होण्यासाठी सक्षम असणार्‍या (‘बायोडिग्रेडेबल’) अशा श्री गणेशमूर्ती बनवत आहेत. ही मूर्ती सिद्ध करतांना सिद्ध केलेल्या साच्यात लाल माती आणि खत घट्ट भरले जाते.

विरार येथे लोकलमध्ये मिळाली जिवंत काडतुसे !

विरार रेल्वेस्थानकावर ६ ऑगस्टला विरार-दादर या लोकलमध्ये पिशवीत जिवंत काडतुसे मिळाली. ही माहिती एका प्रवाशाने रेल्वेसुरक्षा दलाला दिली. बॉम्बच्या अफवेमुळे तेथे आर्पीएफ्, जीआर्पी आणि स्थानिक पोलीस श्‍वानपथकासह पोहोचले.

केडगाव (जिल्हा पुणे) येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’कडून ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’चे आयोजन

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील होण्याचा धर्माभिमान्यांचा निर्धार ! केडगाव (जिल्हा पुणे), ६ ऑगस्ट (वार्ता.) – २९ जुलै या दिवशी येथील श्री बोरमलनाथ मंदिराच्या सभागृहात ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ पार पडली. रामनाथी, गोवा येथे जूनमध्ये झालेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून प्रेरणा घेऊन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच’चे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी हे आयोजन केले. या … Read more

‘हिंदु राष्ट्रजागृती अभियाना’च्या माध्यमातून गुरुचरणी अर्पिली धर्मप्रसाररूपी कृतज्ञतापुष्पे

‘सहस्रो साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे श्रद्धास्थान असलेले, अखिल जगताच्या उद्धाराची तळमळ असलेले, जलद आध्यात्मिक उन्नती साधून देणार्‍या ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या साधनामार्गाचे निर्माते, हिंदु राष्ट्राचा उद्गाते म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

भरतीचे बुडबुडे !

बुडबुड्याचे आकारमान मोठे असते; पण प्रत्यक्षात त्यामध्ये पाणी नाही, तर हवाच असते. तशीच अवस्था भरती प्रक्रियेची आहे. एकीकडे प्रत्येक क्षेत्रात सहस्रो जागा रिक्त असल्याची आकडेवारी आहे, तर दुसरीकडे लक्षावधी सुशिक्षित युवावर्ग रोजगाराच्या संधीच्या प्रतीक्षेत असल्याचेही चित्र आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now