सोमवंश सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाच्या २ तरुणांना अटक केल्याच्या निषेधार्थ हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे मूक मोर्चा !

येथील सोमवंश सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे तरुण श्री. गणेश मिस्कीन आणि श्री. अनिल बड्डी यांना कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक केल्याने या दोघांच्या पालकांनी समाजाच्या पंच समितीकडे दाद मागितली.

मणीपूरमध्ये काँग्रेसच्या आमदाराच्या घरातून  शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) मणीपूर येथील काँग्रेसचे आमदार यमथोंग हाओकीप यांच्या घरावर छापा टाकला आणि तेथून शस्त्रसाठा जप्त केला. यात पोलीस महासंचालकांच्या शस्त्रागारातून हरवलेल्या एका पिस्तुलाचाही समावेश आहे.

श्री वैष्णोदेवी यात्रेतील भक्तांची संख्या ठरवण्यात हस्तक्षेप करू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

श्री वैष्णोदेवी यात्रेकरूंची संख्या नियंत्रित करावी, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

नागपूर येथे अनधिकृत ठरवली गेलेली मंदिरे पाडण्यास भाजपच्या नगरसेवकांचा विरोध !

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत ठरवल्या गेलेल्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण तोडण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. आतापर्यंत ५० हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘डोकलामचा प्रश्‍न सुटला आहे !’ – परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

डोकलामचा प्रश्‍न कूटनीतीद्वारे सोडवण्यात आला आहे आणि तेथील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या वेळी दिली. 

भारतात मुसलमान बहुसंख्य झाले, तर लोकशाही रहाणार नाही ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

ज्या दिवशी भारतात मुसलमान बहुसंख्य होतील त्या दिवशी भारतात लोकशाही रहाणार नाही आणि भारत धर्मनिरपेक्षही रहाणार नाही, असे विधान बैरिया मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले. ते पुढे म्हणाले….

(म्हणे) ‘भारतात एकही बांगलादेशी नाही !’ – बांगलादेशाचा कांगावा

भारतात एकही बांगलादेशी नागरिक नाही, असे बांगलादेशाचे माहिती, प्रसारण आणि सूचनामंत्री यांनी म्हटले आहे. आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका प्रकाशित झाल्यानंतर राज्यात ४० लाख बांगलादेशी घुसखोर असल्याचे उघड करण्यात आले.

(म्हणे) ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून देशात रक्तपात होऊन यादवी माजेल !’ – ममता बॅनर्जी

आसाममध्ये बनवण्यात आलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेद्वारे ४० लाख लोकांना घुसखोर ठरवण्यात आल्याने देशात रक्तपात होऊन यादवी निर्माण होऊ शकते, असे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी …..

आरोग्य विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तज्ञ समिती स्थापन !

आरोग्य विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आरोग्य सेवेचा आकृतीबंध निर्माण करण्यासाठी उपाययोजना सिद्ध करून त्याविषयीचा कृती अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now