केरळमधील माकप आणि त्याचे सरकार राज्यात ‘रामायण मास’ साजरा करणार

मल्याळम् दिनदर्शिकेतील अंतिम मास असणार्‍या ‘करकीडक्कम’ मासात ‘रामायण मास’ आयोजित केले जाते. यावर्षी राज्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आणि पक्ष यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करत आहे.

नाणार प्रकल्पावरून शिवसेना आक्रमक !

कोकणातील नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधात विधानसभेत शिवसेना आक्रमक झाली. नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पावर सरकारने म्हणणे मांडावे, या मागणीसाठी शिवसेनेने ११ जुलैला विधानसभेत गदारोळ केला, तसेच शिवसेना….

श्री शनैश्‍वर मंदिर सरकारीकरणाच्या विधेयकाला माझा विरोध राहील ! – सुभाष देसाई, उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण होऊ नये, यासाठी मी तुमच्या सोबत राहीन. श्री शनैश्‍वर मंदिराचे सरकारीकरण करण्याचे विधेयक या अधिवेशनात आले, तर माझा त्याला विरोध राहील, असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री……

तक्रार प्रविष्ट होऊन ४३ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.

(म्हणे) ‘संत तुकाराम महाराज यांचा खून करण्यात आला !’

भिडेगुरुजी मनूचे समर्थन करत आहेत. तुकाराम, ज्ञानेश्‍वर यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ आहे, असे ते सांगत आहेत. कर्मकांड धुडकावून लावले, जातीय विद्वेष नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परिणामी त्यांचा खून झाला. त्या तुकारामांपेक्षा मनु श्रेष्ठ असू शकत नाही…….

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांतील नागरिकांकडून सक्तीने मालमत्ता कराची वसुली करू नये ! – मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश

कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या २७ गावांमधील नागरिकांची भावना लक्षात घेता महापालिकेने त्यांच्याकडून अतिरिक्त मालमत्ता कराची सक्तीने वसुली करू नये, असे निर्देश दिले जातील.

‘रिलायन्स फाऊंडेशन’ची ‘जिओ इन्स्टिट्यूट’ अस्तित्वात येण्यापूर्वीच तिला ६ गुणवत्ता संपन्न संस्थांमध्ये स्थान

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील ३ आणि खासगी क्षेत्रातील ३ अशा एकूण ६ शैक्षणिक संस्थांना केंद्र सरकारने ‘उत्कृष्ट’ शैक्षणिक संस्था म्हणून घोषित केले आहे; मात्र यातील खासगी संस्था असणार्‍या ‘रिलायन्स फाऊंडेशन’च्या ‘जिओ इन्स्टिट्यूट’ला स्थापनेपूर्वीच स्थान देण्यात आले आहे.

राज्यातील १ सहस्र  ७०९ मुले क्षयरोगाने बाधीत

मार्च २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीमध्ये राज्यात १ सहस्र ७०९ मुलांना क्षयरोगाची लागण झाली. त्यांपैकी ६८५ मुले ही मुंबईतील, ४५० पेक्षा अधिक पालघरमधील, तर १०० पेक्षा अधिक ठाण्यातील असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

ब्राह्मण पुजार्‍याने मागासवर्गीय भक्ताला खांद्यावरून मंदिरात नेले

येथील प्रसिद्ध चिलकुर बालाजी मंदिराचे ६० वर्षीय ब्राह्मण पुजारी एस्. रंगाराजन यांनी अडीच सहस्र वर्षांपूर्वीची ‘मुनी वाहन सेना’ ही प्रथा पुनरुज्जीवित करत एका मागासवर्गीय भक्ताला नुकतेच खांद्यावरून वाहून मंदिरात नेले. ‘मुनी वाहन सेना’ ही शास्त्रामध्ये सांगितलेली जुनी प्रथा आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now