गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्लक
पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतात……
पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतात……
केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील अब्जावधी रुपयांचा खजिना प्रदर्शनासाठी खुला करण्याच्या सूचनेला त्रावणकोरच्या राजघराण्याने विरोध दर्शवला आहे. एकेकाळी या मंदिराची मालकी त्रावणकोर राजघराण्याकडे होती.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय स्वतःला देव समजते का ? कि स्वतःला सर्वोच्च सत्ता मानते ? मंत्रालयाच्या मते न्यायाधीश रिकामटेकडे आहेत का ? कि मंत्री सांगतील त्याप्रमाणे न्यायाधीश काम करतील ?, अशा तीव्र शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला खडसावले.
येथील कुंदलन गावात आतंकवाद्यांच्या विरोधात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. या वेळी २ सैनिक घायाळ झाले. सायंकाळी उशिरापर्यंत ही चकमक चालू होती.
मुंबईत गेल्या ३ दिवसांपासून सतत पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर आणि घरांमध्येही पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अंधेरी, मालाड, बोरिवली, शीव, परळ यांसह हिंदमाता परिसर येथे साठलेल्या पाण्याला अक्षरशः नद्यांचेच स्वरूप प्राप्त झाले होते.
नाणार प्रकल्प (रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होऊ घातलेला आशिया खंडातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प) शासन जनतेवर लादणार नाही. कोणत्याही चुकीच्या समजुतीतून हा प्रकल्प उभारला जाणार नाही…..
‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्या सनातनच्या साधकांना समाजकंटकांच्या विरोधाला सामोरे जाण्याचे प्रसंग अनेकदा घडतात.
‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्राच्या वेळी रामायणाच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी तेलुगू चित्रपटांचे समीक्षक काथी महेश यांना तेलंगण पोलिसांनी ६ मासांसाठी भाग्यनगरमधून तडीपार केले आहे.
रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.