मनूच्या विचारांचे सरकार समर्थन करत नाही ! – पू. भिडेगुरुजी यांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

राज्य सरकार ज्ञानोबा, तुकाराम यांचे विचार आणि राज्यघटना यांच्याशी बांधील आहे. मनूच्या विचारांचे सरकार समर्थन करत नाही. हे राज्य राज्यघटनेवर चालवले जाते. संभाजी भिडे यांनी राज्यघटनेच्या विरोधात वक्तव्य केले असेल, तर कारवाई करण्यात येईल. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तक्रारीत तथ्य असल्याची शासनाची स्वीकृती : चौकशीचा आदेश

‘श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’ने २० फेब्रुवारी २०१८ या दिवशी पत्रकार परिषद घेऊन येथील प्रभादेवीमधील श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांकडून भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा कशा प्रकारे अपहार झाला, हे पुराव्यांसह उघड केले होते.

संजय साडविलकर यांना अटक केल्यास अवैध शस्त्रविक्रीचे मोठे रॅकेट उघड होईल ! – अधिवक्ता समीर पटवर्धन यांचा युक्तीवाद

संजय साडविलकर यांनी न्यायालयासमोर ‘वर्ष १९८५ ते १९८८ या कालावधीत माझ्याकडे दुसरा व्यवसाय नसल्याने मी उदरनिर्वाहासाठी गावठी रिव्हॉल्व्हर खरेदी-विक्रीचे काम करत होतो’, असा कबुलीजबाब दिला आहे. त्यांना अटक केल्यास अवैध शस्त्रविक्रीचे मोठे रॅकेट उघड होईल ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

श्री जगन्नाथ मंदिरामध्ये अन्य धर्मियांना प्रवेश नको ! – शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

सनातन धर्माची अनेक युगांची परंपरा आहे. त्याचे उल्लंघन करून श्री जगन्नाथ मंदिरात सर्वांना प्रवेश देणे आम्हाला स्वीकार्य नाही, असे प्रतिपादन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला ४७ दिवसांतच फाशीची शिक्षा

येथील खमरिया भागात ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या भग्गी उपाख्य भगीरथ पटेल (वय ४० वर्षे) यास सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली.

सुर्ला (सत्तरी) गाव दारूमुक्त करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या सत्तरी तालुक्यातील सुर्ला गावातील ग्रामस्थांनी दारूमुक्त गाव करण्याचा संकल्प केला आहे. येथील देवस्थान परिसरात घेतलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी दारूमुक्तीचा ठराव सर्वांनुमते संमत केला.

वेदमंत्र म्हणण्यास सांगितले; म्हणून एखाद्याला रोखणे, ही असहिष्णुता ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

मंत्रांचा संबंध वायूतत्त्वाशी आहे. संगीतातील विविध रागांमुळे पर्जन्यवृष्टी होते, असे आपण मानतो. मंत्रांमध्ये शक्ती आहे, अशी भारतियांची श्रद्धा आहे. सरकारने वेदमंत्र म्हणण्यासाठी व्यय करावा अथवा करू नये, हा वेगळा प्रश्‍न आहे; परंतु ‘वेदमंत्र म्हणा’, असे सांगणे हा कायद्याने गुन्हा नाही.

मदर तेरेसा यांच्या संस्थेतून आतापर्यंत २८० मुलांची विक्री करण्यात आल्याचा संशय !

मदर तेेरेसा यांची संस्था ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’कडून संचालित करण्यात येणार्‍या ‘निर्मल हृदय’ या अनाथालयातून एका मुलाची विक्री करण्यात आल्याची आणि या प्रकरणी २ नन्सला अटक करण्याची घटना उघडकीस आली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now