गुरुपौर्णिमेला १८ दिवस शिल्लक

शिष्यात मुमुक्षुत्व असले, तर त्याच्या चुका झाल्या तरी गुरु त्याला सांभाळून घेतात. शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय. शिष्य जरी गुरूंवर खूप रागावला असला,……

संतांनी अध्यात्म सांगितले, तर मनूने अध्यात्मासह राष्ट्र टिकवण्याचा मार्ग सांगितला ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

संतांनी अध्यात्मावर भाष्य केले, तर मनूने त्याही पुढे जाऊन अध्यात्मासह राष्ट्र टिकवण्याचा मार्ग सांगितला, असे मार्गदर्शन पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी ‘भक्ती-शक्ती संगम’ या कार्यक्रमाच्या वेळी म्हणजेच ७ जुलै या दिवशी केले.

(म्हणे) ‘गणवेश घालून कामावर असतांना टिळा लावू नये किंवा गंडेदोरे बांधू नयेत !’

मुंबई पोलीसदलाचे नाव आदराने घेतले जाते. ही प्रतिमा जपण्यासाठी स्वच्छ खाकी वर्दी परिधान करा. गणवेश घालून कामावर असतांना टिळा लावू नये, तसेच गंडे-दोरे बांधू नयेत, अशा सूचना मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी मुंबई पोलीस …..

देहलीत हिंदुत्वनिष्ठ संघटनेने काश्मीरमधील दगडफेक करणारे आणि फुटीरतावादी यांच्या विरोधात भित्तीपत्रके लावली

गेल्या काही वर्षांपासून काश्मीर खोर्‍यात जिहादी भारतीय सैन्यावर दगडफेक करत आहेत. त्यांना हुरियत कॉन्फरन्स, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या फुटीरतावादी संघटना अन् राजकीय पक्ष यांची फुस आहे.

शाळेत विद्यार्थ्यांना छडीद्वारे मारण्यावर बंदी ! – केंद्र सरकारचा आदेश

राष्ट्रीय बालहक्क आयोगाने केलेल्या सूचनांनुसार, केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने शाळेत विद्यार्थ्यांना छडीने मारण्यावर बंदी घातली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळेमध्ये छडी न ठेवण्याचा आदेश शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांना दिला आहे.

केरळ येथे कपाळावर गंध लावल्याने विद्यार्थिनीची मदरशातून हकालपट्टी

केरळमधील एका मदरशात कपाळावर गंध लावून गेल्यामुळे पाचवीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीची हकालपट्टी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मदरशातील एका लघुपटात ही विद्यार्थिनी अभिनय करणार होती.

विधीमंडळात मी स्वत: बोलतो आणि स्थानिक आमदारांनाही बोलायला सांगतो ! – आमदार सुनील प्रभु, शिवसेना

पंढरपूर आणि नाशिक येथील मंदिरांच्या घोटाळ्यांच्या विरोधात यापूर्वी मी आवाज उठवला आहे. श्री शनैश्‍वर मंदिराच्या सरकारीकरणाविषयी विधीमंडळात मी स्वत: बोलतो आणि तेथील स्थानिक आमदारांनाही बोलायला सांगतो….

तक्रार प्रविष्ट होऊन ४० दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधनाच्या माध्यमातून लोकांना आपल्या संस्कृतीविषयी अवगत करण्याचे अद्भुत कार्य होत आहे’ ! – अशोक प्रधान, संचालक, भारतीय विद्या भवन, देहली.

भारतीय विद्या भवनचे संचालक (निदेशक) श्री. अशोक प्रधान आणि या विद्या भवनच्या इंडोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. शशिबाला यांची सौ. श्‍वेता क्लार्क आणि कु. कृतिका खत्री यांनी २९ जून २०१८ या दिवशी भेट घेतली.

भ्रष्टाचार आणि मानवाधिकाराचे उल्लंघन याविषयी कार्यवाही करण्याचे अधिकार शासनाचे, अन्य संस्थांनी त्यांच्या नावातील हे शब्द न काढल्यास कारवाई होणार !

‘भ्रष्टाचार निर्मूलन’ वा ‘मानवाधिकार’ हे कुठल्याही संस्थेचे उद्देश असू शकत नाहीत. कोणत्याही संस्थेला त्यांच्या नावात हे शब्द वापरता येणार नाहीत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now