गुरुपौर्णिमेला २३ दिवस शिल्लक

गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.            

बंगालमधील तलावामध्ये हात आणि पाय बांधलेल्या स्थितीत भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला !

येथे भाजपचे ५४ वर्षीय कार्यकर्ते धर्मराज हजरा यांचा हात आणि पाय बांधलेल्या स्थितीतील मृतदेह येथील शक्तीपुरा गावातील एका तलावात सापडला. यापूर्वी गेल्या मासात पुरूलिया जिल्ह्यात भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याच्या …….

गणेशोत्सवासाठी केवळ १० दिवस आधी मंडप उभारण्याची अनुमती मिळणार ! – महापालिका

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी १० दिवस आधी मंडप उभारण्याची अनुमती मिळणार असल्याचे मुंबई महापालिकेने घोषित केले आहे; मात्र या मुदतीच्या अगोदर अथवा अनुमती न घेताच उभारण्यात आलेले मंडप अनधिकृत समजून त्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे …..

मुंब्रादेवी मंदिरात चोरी

महागिरी येथील होलसेल मार्केटमध्ये मुंब्रादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या लोखंडी दरवाजाची कडी वाकवून चोरांनी १ लाख १२ सहस्त्र ५०० रुपयांचा ऐवज चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोमूत्रामुळे कर्करोग बरा होऊ शकतो ! – गुजरातमधील संशोधकांचा दावा

गोमूत्रामुळे तोंड, यकृत, मूत्रपिंड, त्वचा आणि स्तन यांना झालेला कर्करोग बरा होऊ शकतो, असा दावा येथील जुनागड कृषी विद्यापिठाच्या संशोधकांनी केला आहे. कृषी विद्यापिठाचे श्रद्धा भट, रुकमसिंग तोमर आणि कविता जोशी यांनी वर्षभर केलेल्या …….

गोरक्षणाच्या नावावर हिंसा होऊ नये ! – सर्वोच्च न्यायालयाची गोरक्षकांना चेतावणी

गोरक्षणाच्या नावावर हिंसाचार होऊ नये. कायदा असो कि नसो, कोणताही जमाव कायदा हातात घेऊ शकत नाही. अशा प्रकारच्या घटना देशातील कोणत्याही भागात होऊ नयेत. या संदर्भात राज्यांचे दायित्व आहे की, त्यांनी अशा घटना होऊ देऊ नयेत

अंधेरी रेल्वेस्थानकाजवळील पुलाचा काही भाग रेल्वेरुळांवर कोसळला !

अंधेरी पूर्व आणि पश्‍चिम यांना जोडणार्‍या गोखले पुलाचा काही भाग रेल्वेरुळांवर कोसळल्याने विरार ते चर्चगेट या मार्गावरची पश्‍चिम रेल्वेची वाहतूक ३ जुलै या दिवशी ठप्प झाली. या दुर्घटनेत ५ जण घायाळ झाले आहेत.

तक्रार प्रविष्ट होऊन ३५ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now