गुरुपौर्णिमेला २५ दिवस शिल्लक

मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम  प्रारब्ध  भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते. 

टाइम्स समूहाच्या इंदू जैन, विनीत जैन आणि २ पत्रकारांना न्यायालयाकडून दंड !

सनातन संस्था आणि संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त वीरेंद्र मराठे यांच्याविषयी विपर्यस्त लिखाण छापून प्रतिष्ठेस हानी पोचवल्याविषयी भरपाई मागणारा दावा अधिवक्ता विवेक भावे यांनी कल्याणच्या दिवाणी न्यायालयात ऑगस्ट २०१६ मध्ये प्रविष्ट केला होता.

हिंदु आरोपींवर अन्याय करणारे भ्रष्ट अधिकारी आणि यंत्रणा यांच्या विरोधात आम्ही लढू ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी ज्या आरोपींना अटक झाली, त्या वेळी त्यांना न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आलेले नाही, तर परस्पर संबंधित न्यायाधिशांची स्वाक्षरी घेण्यात आली. आरोपींना अधिवक्त्यांचे कोणतेही साहाय्य मिळू दिले नाही.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मशिदीसमोर लक्ष्मणाची मूर्ती उभारण्याच्या प्रस्तावाला मुसलमानांचा विरोध

उत्तरप्रदेशची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील टिलेवाली मशिदीसमोरील लाल पुलाजवळ नगरपालिकेच्या जागेवर लक्ष्मणाची एक भव्य मूर्ती उभारण्याच्या प्रस्तावाला लक्ष्मणपुरी नगरपालिकेने मान्यता दिली आहे.

सरकारी आर्थिक साहाय्य नको, तर आरोपींना फाशीची शिक्षा द्या ! – पीडित मुलीच्या वडिलांची मागणी

मध्यप्रदेशातील मंदसौर येथे एका ८ वर्षांच्या मुलीवर इरफान आणि आसिफ या वासनांधांनी सामूहिक बलात्कार करून तिच्यावर निर्घृण अत्याचार केले आहेत. त्या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. पीडित मुलीच्या पालकांना मध्यप्रदेश सरकारने ५ लाख रुपयांचे ……

तक्रार प्रविष्ट होऊन ३३ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.

भारतापेक्षा चीन रशियाचा सर्वांत जवळचा मित्र

रशियाच्या जवळच्या ५ मित्र देशांमध्ये भारताचा समावेश असला, तरी त्यांच्यासाठी सर्वांत जवळचा देश चीन आहे, असे रशियातील एकमेव खासगी संस्थेने म्हटले आहे.

गेल्या ४ वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्‍यांवर ३५५ कोटी, तर मनमोहन सिंह यांच्या १० वर्षांतील दौर्‍यांवर ६४२ कोटी रुपये व्यय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४ वर्षांत ४१ परदेश दौरे केले आहेत. या दौर्‍यांवर ३५५ कोटी रुपये व्यय (खर्च) झाले आहेत. बेंगळूरू येथील नागरिकाने माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मिळवली आहे.

काँग्रेसला त्यांची चूक लक्षात यायला हवी ! – माजी संरक्षणमंत्री तथा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

काँग्रेसला त्यांची चूक लक्षात यायला हवी. सर्जिकल स्ट्राईकचा विषय राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि सैन्य यांच्याशी संबंधित असल्याने त्याविषयी बोलतांना काँग्रेसने काळजी घ्यायला हवी, असे परखड प्रतिपादन माजी संरक्षणमंत्री तथा गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली.

गेल्या ७ वर्षांत देशात विमान अपघाताच्या ५२ घटना

मुंबईतील घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात चार्टर्ड विमान कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २८ जूनला घडली. या घटनेनंतर गेल्या ७ वर्षांतील विमान अपघातांची आकडेवारी पाहिल्यास अशा एकूण ५२ घटना घडल्याची माहिती मिळते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now