गुरुपौर्णिमेला २६ दिवस शिल्लक

गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरःसर भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.  

अरुणाचल प्रदेशातील भाजप सरकार धर्मांतरविरोधी कायदा रहित करणार

धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील अरुणाचल प्रदेश सरकारने ४० वर्षांपासून कार्यवाहीत असलेला धर्मांतरविरोधी कायदा रहित करण्याचे ठरवले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केली आहे.

वेरूळ (जिल्हा संभाजीनगर) येथील पू. शांतीगिरी महाराज यांना जिवे मारण्याची पत्राद्वारे धमकी

येथील जनार्दन स्वामी धर्मपिठाचे उत्तराधिकारी महामंडलेश्‍वर पू. शांतीगिरी महाराज यांना २९ जून या दिवशी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ‘आपल्याला ढगात पाठवण्याची किंवा आसाराम बापू करण्याची सिद्धता झाली आहे,…

बिशपने लैंगिक शोषण केले ! – केरळमधील ननचा आरोप

केरळमधील एका चर्चच्या ५ पाद्य्रांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप नुकताच झाला असतांना आता राज्यातील एका ननने उत्तर भारतातील ‘डायोसीस’च्या कॅथोलिक बिशपवर तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

भेटण्यासाठी आलेल्या भाजपच्या खासदाराचे आभार मानण्यासाठी भाजपच्या आमदाराकडून पीडित मुलीच्या पालकांना दमदाटी

भाजपचे खासदार सुधीर गुप्ता हे पीडित मुलीच्या पालकांना भेटायला गेले होते. त्या वेळी भाजपचे आमदार सुदर्शन गुप्ता यांनी पीडितेच्या पालकांना खासदार गुप्ता भेटायला आले; म्हणून त्यांचे दमदाटी करून आभार मानायला लावले.

अरुणाचल प्रदेशमध्ये दरड कोसळून ५ ठार

अरुणाचल प्रदेशच्या लोअर सिआंग जिल्ह्यातील बसर-अकाजन मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या वाहनावर दरड कोसळली. यामुळे ५ पोलिसांचा मृत्यू झाला.

(म्हणे) ‘स्विस बँकेतील पैसा अनिवासी भारतियांचा !’ – जेटली

स्विस बँकेमध्ये जमा असलेला सगळाच पैसा काळा नाही. परदेशात जे भारतीय वास्तव्याला आहेत, त्यांचे स्विस बँकेत खाते आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण पैशाला ‘काळा पैसा’ म्हणू शकत नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

माझा मुलगा देवाच्या मार्गावर असल्याने तो हुतात्मा न होता जिवंत परत आला, तर मीच शिरच्छेद करीन !

भारतीय सैनिक काश्मीरमधील एका आतंकवाद्याच्या घरी जाऊन त्याच्या पालकांना विनंती करत आहेत की, त्यांनी त्यांच्या मुलाला शरणागती पत्करण्यास सांगावे; मात्र आतंकवाद्याचे पालक तसे सांगण्यास नकार देत असून ‘‘आतंकवाद योग्यच आहे

तक्रार प्रविष्ट होऊन ३२ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.

डोकलाम प्रकरणानंतर चीनकडून प्रथमच तिबेटमध्ये सैन्य सराव

डोकलाम येथील भारतासमवेत झालेल्या वादानंतर चीनने पहिल्यांदाच तिबेटमध्ये सैन्य सरावाचे आयोजन केले होते. सैन्य आणि नागरिक यांच्यातील संवाद यांचा तपास करण्यासाठी या सरावाचे आयोजन करण्यात आले होते, असा दावा चीनच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now