के.टी. नवीन कुमार यांच्या ‘पॉलिग्राफ टेस्ट’चा अहवाल पोलिसांनी का लपवला ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे अन्वेषण करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाने (‘एस्आयटी’ने) मड्डूर (कर्नाटक) येथील हिंदु युवा सेनेचे श्री. के.टी. नवीन कुमार यांच्यासह अन्य ४ जणांना अटक केली आहे.

हिंदुत्वरक्षणासाठी पू. भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडे ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

पू. भिडेगुरुजी यांच्याविषयी आम्हाला कमालीचा आदर आहे. हिंदुत्वासाठी त्यांची अखंड धडपड चालू असते. हिंदुत्व, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कुणाची जीभ घसरलीच, तर त्यांचा समाचार घेण्यासाठी पू. भिडेगुरुजी उसळून उभे रहातात.

(म्हणे) ‘संभाजी भिडे यांच्या सभांवर बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार !’ – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या उलट-सुलट बोलण्यामुळे अस्थिरता निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्या सभांना बंदी घातली पाहिजे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ……

पुलवामा (काश्मीर) न्यायालयाच्या आवारात झालेल्या आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील न्यायालयाच्या आवारात १२ जूनच्या पहाटे आतंकवाद्यांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकावर आक्रमण केले. त्यात २ पोलीस हुतात्मा, तर ३ घायाळ झाले.

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीत राष्ट्रगीताचा अवमान

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ७ जून या दिवशी येथे इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीच्या वेळी राष्ट्रगीत वाजवण्यात आले; मात्र या वेळी उपस्थित असणारे अनेक जण उभे राहिले नव्हते.

इंदूर येथील प.पू. भय्यूजी महाराज यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

येथील प.पू. भय्यूजी महाराज (वय ४८ वर्षे) यांनी त्यांच्या रहात्या घरात १२ जूनला स्वतःवर स्वतःच्या नावे परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. गोळी झाडल्यानंतर त्यांना लगेच जवळच्या बॉम्बे रुग्णालयात भरती करण्यात आले ……

रिझर्व्ह बँक आणखी ६ बँकांवर निर्बंध घालण्याच्या सिद्धतेत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आणखी सहा बँकांवर मोठी कारवाई करण्याच्या सिद्धतेत आहे.

नोटाबंदीनंतर रोखीचे चलन दुप्पट

नोटाबंदीच्या निर्णयानंतरच्या काळात रोखीचे प्रमाण ७ लाख ८० सहस्र कोटी रुपये इतके खाली आले असतांना आता ते १८ लाख ५० सहस्र कोटी म्हणजे दुप्पट झाले आहे.

वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या महिलेवर साजिद हसन नावाच्या डॉक्टरकडून बलात्कार

मीरनपूर येथे वैद्यकीय तपासणीसाठी चिकित्सालयात आलेल्या एका महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी साजिद हसन नावाच्या एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.