गुरुपौर्णिमेला ४६ दिवस शिल्लक

अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण-रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्या सगुणरूपाची सेवा ही ३० टक्के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्ही करणे आवश्यक आहे.      

रायगडावरील सुवर्ण सिंहासनाच्या संरक्षणासाठी भविष्यात तलवारी हातात घ्याव्या लागतील ! – पू. भिडेगुरुजी

रायगडावर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुवर्ण सिंहासन सिद्ध करण्यात येणार आहे. या सिंहासनाच्या संरक्षणासाठी धारकरी सध्यातरी हातात काठ्याच घेऊन जातील; मात्र वेळ पडली, तर त्यांना भविष्यात हाती तलवारी घ्याव्या लागतील.

कर्नाटकचे उच्चशिक्षणमंत्री ८ वी शिक्षित

कर्नाटकच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस युतीच्या सरकारने उच्चशिक्षणमंत्री म्हणून ८ वी उत्तीर्ण आमदार जी.टी. देवेगौडा यांना मंत्री केले आहे.

बिष्णोई समाजातील गुंडांकडून अभिनेते सलमान खान यांच्या हत्येचा कट ! – हरियाणा पोलिसांचा दावा

अभिनेते सलमान खान यांची हत्या करण्याचा कट पंजाबमधील बिष्णोई समाजातील एका टोळीने रचला होता, असा दावा हरियाणा पोलिसांनी केला आहे. या टोळीतील संपत नेहरा याला पोलिसांनी अटक केली आहे.

भाजपचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि रा.स्व. संघ पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचत आहे !

जेएन्यू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा शेहला रशीद यांनी ‘ट्वीट’द्वारे ‘केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि रा.स्व. संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचत आहे.

ओडिशातील जगन्नाथपुरी मंदिरातील अस्वच्छतेवर सर्वोच्च न्यायालयाकडून ३ समित्या स्थापन करण्याचा आदेश

ओडिशातील जगन्नाथपुरी मंदिरात भाविकांशी उद्दाम वर्तन आणि अन्य होणारा त्रास दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर ३ समित्या स्थापन करण्याचा आदेश दिला. त्यांच्या अहवालावर ५ जुलै या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.

काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारे ६ आतंकवादी ठार

कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमधील सीमेवरून भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असणार्‍या ६ आतंकवाद्यांना सैनिकांनी ठार केले. सैन्याने रमझानच्या काळात आतापर्यंत तिसर्‍यांदा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

मोखाडा (जिल्हा ठाणे) येथे धर्मांधांच्या २ गटांत दंगल

येथे ८ जून या दिवशी धर्मांधांच्या २ गटांत मोठी दंगल झाली. या प्रकरणी पोलिसांनी ८५ दंगलखोरांवर गुन्हा नोंदवला आहे आणि ४२ जणांना कह्यात घेतले आहे. त्यात ६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

रामजन्मभूमीवर मंदिर असल्याचे पुरावे वर्ष १९७६-७७ मध्येच सापडले होते; मात्र पुरातत्व खात्याच्या साम्यवादी विचारांच्या प्रमुखाने ते दडपले !

केंद्र सरकारने पहिल्यांदा वर्ष १९७६-७७ मध्ये अयोध्येतील रामजन्मभूमीचे सर्वेक्षण करण्यासाठी पुरातत्व खात्याची दोन सदस्यांची समिती बनवली होती. त्यात मी एक होतो. या सर्वेक्षणातून तेथील मंदिराला पाडून मशीद बांधण्यात आली होती,

फलटण येथील सनातनचे साधक श्री. उदय ओझर्डे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातनचे साधक श्री. उदय ओझर्डे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. दीपाली मतकर यांनी श्री. ओझर्डेकाका यांचा श्रीकृष्णाचे चित्र देऊन सत्कार केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now