गुरुपौर्णिमेला ४७ दिवस शिल्लक

कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.  

लक्ष्मणपुरी येथील प्राचीन मनकामेश्‍वर मंदिरामध्ये इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन

येथील सर्वांत प्राचीन शिवमंदिर असणार्‍या मनकामेश्‍वर मंदिरामध्ये पहिल्यांदाच इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन १० जून या दिवशी करण्यात आले आहे. गोमती नदीच्या किनार्‍यावर असणार्‍या या मंदिराच्या उपवन घाटावर ही मेजवानी होणार आहे.

‘सनातन’च्या आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यासाठी डाव्यांकडे अख्खा नक्षलवाद !’

माओवादी संघटनेच्या ‘सेंट्रल कमिटी’चे सदस्य मिलिंद तेलतुंबडे याने कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणी आता अटक केलेल्या रोना विल्सन याला पूर्वी पाठवलेल्या पत्रात काँग्रेस, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, गुजरात येथील आमदार जिग्नेश मेवाणी,…..

वादळी पावसामुळे ५० हून अधिक लोकांचा मृत्यू

देशातील  देहली, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा राज्यांमध्ये ८ जून या दिवशी झालेल्या वादळी पावसामुळे ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच शेकडो नागरिक घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 मुसळधार पावसामुळे मुंबईत नेहमीप्रमाणे सखल भाग पाण्यात !

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुंबईसह कोकणपट्ट्यात आणि गोवा राज्यात ९ जूनला विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित झाला, तर हिंगोली येथे शेतकर्‍यांनी पेरलेले बियाणे वाहून गेले.

काश्मीरला भारतात दाखवणार्‍या पुस्तकावर पाकिस्तानकडून बंदी

भारताचा भाग दाखवणार्‍या पुस्तकावर पाकिस्तानने बंदी घातली आहे. पाकच्या पंजाब प्रांतातील खासगी शाळांमधील सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातील मानचित्रामध्ये (नकाशामध्ये) काश्मीर भारताचा भाग असल्याचे दाखवण्यात आले होते.

मुसलमानांनी आता काँग्रेसवर विश्‍वास ठेवू नये ! – ओवैसी

मुसलमानांनी राजकीय शक्ती दाखवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मुसलमानांनी आता काँग्रेसवर विश्‍वास ठेवू नये. तो पक्ष संपला आहे. आता भाजप आणि काँग्रेस यांना नवीन पर्याय शोधण्याची वेळ आली आहे,

आगामी भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता करा !

सध्या जागतिक स्तरावर चाललेल्या घडामोडी पहाता सगळीकडे अस्थिरता आणि असहिष्णुता वाढत चालल्याचे दिसत आहे. एकीकडे वर्चस्ववाद, तर दुसरीकडे अन्न आणि स्वच्छ पाणी यांची न्यूनता अशी दुहेरी संकटे दिसत आहेत.

गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करणे, हाच संशोधनकार्यामागील उद्देश !

जगभरात भौतिक शिक्षण देणारी अनेक विद्यापिठे असली, तरी अध्यात्मशास्त्राचे परिपूर्ण, तसेच ईश्‍वरप्राप्तीचे शिक्षण देणारे एकही विद्यापीठ नाही. यासाठी २२.३.२०१४ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गोवा येथे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ हा न्यास स्थापन केला असून त्याद्वारे हे विश्‍वविद्यालय उभारले जाईल.

स्वत:मधील स्वभावदोष आणि अहं दूर करणे म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकास ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, उत्तर महाराष्ट्र धर्मप्रसारक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समिती आयोजित सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशना’स रामनाथी, गोवा येथे भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now