हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात करणी सेना तुमच्यासमवेत आहे ! – लोकेंद्रसिंह कालवी, संस्थापक, श्री राजपूत करणी सेना

आज समाजात असलेली व्यवस्था सुधारण्यासाठी आपण गुरु आणि संत यांचे आशीर्वचन ग्रहण करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या वाटेवर मार्गक्रमण करत आहोत. महाराणा प्रताप यांनी हिंदु राष्ट्राचा संकल्प केला होता. तो आपण सर्वांनी मिळून पूर्ण करूया.

जम्मूही मुसलमानबहुल करण्याचे षड्यंत्र ! – राहुल कौल, यूथ फॉर पनून कश्मीर

जिहादी कट्टरतावाद्यांच्या कारवायांनी आता हिंदुबहुल जम्मूलाही विळखा घालण्यास प्रारंभ केला आहे. काश्मीरनंतर आता जम्मूही मुसलमानबहुल करण्याचे षड्यंत्र आखले जात आहे, अशी माहिती ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे श्री. राहुल कौल यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

कच्छ (गुजरात) येथे वायूदलाचे ‘जॅग्वार’ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

येथील मुंद्रा परिसरात भारतीय वायूदलाचे ‘जॅग्वार’ हे लढाऊ विमान कोसळल्याने झालेल्या अपघातात संजय चौहान या वैमानिकाचा मृत्यू झाला. जामनगरहून सकाळी जवळपास साडेदहाच्या सुमारास या विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते.

कतरास (झारखंड) येथील प्रदीप खेमका, मुंबई (महाराष्ट्र) येथील सौ. संगीता जाधव आणि कर्नाटकमधील रमानंद गौडा संतपदी विराजमान

झारखंड राज्याचे धर्मप्रसारक श्री. प्रदीप खेमका (वय ५९ वर्षे), मुंबई-ठाणे-रायगड आणि गुजरात राज्याच्या प्रसारसेविका सौ. संगीता जाधव (वय ४८ वर्षे) आणि कर्नाटक राज्याचे धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा (वय ४२ वर्षे) हे ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून समष्टी संतपदी विराजमान झाले.

(म्हणे) ‘देशाची राज्यघटना धोक्यात असल्याने अनेकांना असुरक्षित वाटत आहे !’ – गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव

आज आपली राज्यघटना धोक्यात असल्यानेच अनेकांना असुरक्षित वाटत आहे. निवडणूक जवळ येत असल्या कारणानेच आपण आपली राज्यघटना समजून घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणे आवश्यक आहे, तसेच त्याचे रक्षण करण्यासाठी परिश्रम घेतल पाहिजेत

भागवतांनी संघ मुख्यालयात इफ्तार मेजवानी ठेवावी ! – नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इफ्तार मेजवानी करावीशी वाटत असेल आणि यानिमित्ताने संघाचे जर हदय पालटत असेल, तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरला संघाच्या मुख्यालयात ती ठेवावी.

अयोध्येतील ५०० वर्षे जुन्या मंदिरात इफ्तारची मेजवानी

४ जून या दिवशी येथील रामजन्मभूमीजवळील सरयू कुंज परिसरातील ५०० वर्षे जुन्या मंदिरात रमजाननिमित्त इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी भाजपला संघमुक्त केले, हीच त्यांची मोठी कमाई ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशाला काँग्रेसमुक्त करण्याआधी भाजपला संघमुक्त केले.

(म्हणे) ‘पाकने डिवचल्यास जशास तसे उत्तर देऊ !’ – संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन्

सैन्याचा सल्ला घेऊनच रमझानमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. पण भारतीय सैन्याला डिवचले, तर पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ….

श्रीनगरमध्ये दगडफेक करणारे धर्मांध सीआर्पीएफ्च्या पोलिसांना जिवंत जाळणार होते !

नौहट्टा परिसरात १ जून या दिवशी शुक्रवारच्या नमाजानंतर स्थानिक ५०० हून अधिक मुसलमानांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनाला घेरून तिच्यावर दगडफेक चालू केली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now