सत्ताप्राप्तीसाठी नव्हे, तर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु संघटनांची एकजूट ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

वर्ष २०१९ च्या निवडणुकीत मिळणारी केंद्रातील राजकीय सत्ता म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना नव्हे, हे वर्ष २०१४ च्या निवडणुकीतील विजयानंतर मिळालेल्या सत्तेतून दिसून आले आहे.

(म्हणे) ‘अमली पदार्थाऐवजी सोन्याची तस्करी करा, त्यात  लगेच जामीन मिळतो !’ – राजस्थानमधील भाजपचे आमदार अर्जुनलाल गर्ग

अमली पदार्थांची तस्करी हा अजामीनपत्र गुन्हा आहे; पण सोन्याची तस्करी करतांना अटक झाल्यास अतिशय सहज जामीन मिळतो. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी न करता सोन्याची तस्करी करा, असे विधान राजस्थानमधील बिलारा……

कर्नाल (हरियाणा) येथे ध्वनीक्षेपकावरून अजान ऐकवण्यात येत असल्याने जमावाकडून मशिदीची तोडफोड

येथील नेवल गावामध्ये मशिदीवरील ध्वनीक्षेपकावरून अजान ऐकवण्यात येत असल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मशिदीमध्ये घुसून तोडफोड केली, तसेच तिची एक भिंत पाडली. याचसमवेत ध्वनीक्षेपकाच्या ‘वायर’ कापल्या…….

गेल्या सरकारच्या तुलनेत भाजप सरकारच्या राज्यात भ्रष्टाचार वाढला !

उत्तरप्रदेशमधील लोकसभा आणि विधानसभा यांच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला दोन्ही जागांवर पराभव झाला. त्यामुळे संतापलेले हरदोई येथील भाजपचे आमदार श्याम प्रकाश यांनी राज्यातील स्वपक्षाच्या सरकारवर टीका केली आहे.

काश्मीरमध्ये २० जिहादी आतंकवादी घुसल्यावरून सुरक्षादल सतर्क

जम्मू-काश्मीरमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधून २० आतंकवाद्यांनी घुसखोरी केली आहे. त्यांच्याकडून सुरक्षादलांवर मोठे आक्रमण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळाल्याने राज्यात सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

रावणाऐवजी रामाने सीतेचे अपहरण केल्याचे प्रकाशित भाजपच्या राज्यातील पुस्तकांत अशा चुका होणे लज्जास्पद !

गुजरातमध्ये इयत्ता १२ वीच्या ‘इंट्रोडक्शन टू संस्कृत लिटरेचर’ या इंग्रजी पुस्तकातील १०६ क्रमांकांच्या पानावरील एका वाक्यात रावणाऐवजी राम शब्द लिहिण्यात आल्याने ‘रामाने सीतेचे अपहरण केले’, असे चुकीचे वाक्य प्रकाशित झाले आहे.

‘गुन्हेगाराला वाचवणे, हे स्वतःचे कर्तव्य आहे’, असे वाटणार्‍या अधिवक्त्यांनी धर्मशास्त्र जाणून घेणे आवश्यक !

‘एका महिला अधिवक्त्यांची एका संतांशी भेट झाली. त्या वेळी त्या संतांनी त्या महिला अधिवक्त्यांना ‘गुन्हेगाराची न्यायालयात बाजू मांडणे, तो निर्दोष सुटण्याकरता प्रयत्न करणे किंबहुना त्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करणे, यांमुळे पाप लागते. त्यामुळे असे करणे अयोग्य आहे’

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी श्री रामनाथ आणि श्री शांतादुर्गादेवी यांना प्रार्थना !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनाथी येथे श्री रामनाथ देवस्थान आणि कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थान येथे मंदिरात श्रींना पुष्पहार आणि श्रीफळ अर्पण करण्यात आले.

विविध राज्यांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांची जागृती करणारे उपक्रम

हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी संयुक्तपणे काढलेल्या ‘हिंदू एकता फेरी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पू. नारद ऋषी यांची समाधी म्हणजे भारत आणि इस्रायल यांच्यातील आध्यात्मिक संबंधाचा प्रारंभ ! – सुरेंद्र जैन, आंतरराष्ट्रीय संयुक्त महासचिव, विश्‍व हिंदु परिषद

भारतातील हिंदूंना आज देशातील विविध भागांत अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे, ही चिंताजनक गोष्ट आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध दृढ होतेच; मात्र त्याला आज आध्यात्मिक जोड मिळाली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now