बंगालमधील पंचायत निवडणुकीच्या हिसाचारात ११ ठार 

बंगालमध्ये १४ मे या दिवशी झालेल्या २० जिल्ह्यांतील पंचायत निवडणुकीच्या वेळी उत्तर २४ परगणा, दक्षिण २४ परगणा, वर्धमान आणि कूचबिहार या ४ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. त्यात ११ जण ठार, तर अनेक जण घायाळ झाले.

मुसळधार पाऊस आणि वादळ यांमुळे देशभरातील ७ राज्यांत ७० जण ठार

१३ मे या दिवशी  सायंकाळनंतर आलेल्या धुळीच्या वादळामुळे आणि त्यानंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तरप्रदेश, बिहार, देहली, बंगाल, गुजरात. आंध्रप्रदेश आणि तेलंगण या ७ राज्यांत ७० जणांचा मृत्यू, तर ६५ जण घायाळ झाले.

इंडोनेशियामध्ये इस्लामिक स्टेटकडून आणखी एक बॉम्बस्फोट

इंडोनेशियामध्ये २४ घंट्यांच्या आत आणखी एक आत्मघाती आक्रमण झाले. येथील पोलीस मुख्यालयाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आत्मघाती स्फोट घडवला.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात आणखी एका मुलीचा मृत्यू

सीतापूर जिल्ह्यात भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १३ मे या दिवशी भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

ओडिशामध्ये ६ नक्षलवादी ठार

राज्यात दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

भाजप आणि संघ कार्यकर्ते विवाह करत नाहीत; म्हणून बलात्कार करतात ! – काँग्रेस

महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रतिदिन बलात्काराच्या घटना ऐकायला मिळत आहेत. बलात्काराच्या वाढत्या घटनांमध्ये मध्यप्रदेशचा तिसरा क्रमांक लागतो.

आजही औरंग्या आणि निजाम यांची वंशावळ संभाजीनगर येथे थैमान घालत आहे, हेच तेथील दंगलीतून सिद्ध होते ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

संभाजीनगरमधील अनेक मोहल्ले कोणत्याही दंगलीसाठी सदैव सिद्ध आहेत, हे पुन्हा दिसले. ‘संभाजीनगर येथे दंगलीचा भडका का उडाला ?’, या प्रश्‍नाचे खरे उत्तर शोधण्याचे दायित्व सरकारचे आहे.

संभाजीनगर येथे झालेली दंगल हेे धर्मांधांचे पूर्वनियोजित षड्यंत्र असल्याचे उघड

येथे ११ मेच्या रात्री झालेल्या दंगलीची ८ दिवसांपासून पूर्वसिद्धता चालू होती. त्यामुळे हे धर्मांधांचे पूर्वनियोजित षड्यंत्र होते, असे काही पुराव्यांद्वारे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी ३५ संशयितांना कह्यात घेतले आहे.

रानमळा (धुळे) येथे ‘हिंदु राष्ट्रजागृती सभे’ला १२५ हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती

जिल्ह्यातील रानमळा या गावात १० मे या दिवशी ‘हिंदु राष्ट्रजागृती सभा’ पार पडली. सभेला सनातन संस्थेचे श्री. सचिन वैद्य आणि हिंदु जनजागृती समितीच्या धुळे आणि नंदुरबार समन्वयक कु. रागेश्री देशपांडे हे प्रमुख वक्ते होते.