नदिया जिल्ह्यात तृणमूलला पराभूत करण्यासाठी भाजप आणि माकप युती

बंगालमध्ये सध्या पंचायत निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे केले आहेत. यातील नदिया जिल्ह्यात काही ठिकाणी भाजपने तृणमूल काँग्रेसला पराभूत करण्यासाठी ….

मी मंदिरात गेल्यावर भाजपला त्रास होतो !  – राहुल गांधी

मी जेव्हा कधी मंदिरांमध्ये जातो, त्याचा सर्वाधिक त्रास भाजपला होतो; कारण मंदिरे त्यांचीच आहेत, असे भाजपला वाटते, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

(म्हणे) ‘उत्तरप्रदेश आणि हरियाणा राज्यांमध्ये पोलीस चकमकीच्या नावाखाली मागासवर्गीय आणि मुसलमान यांच्या हत्या !’ – ‘सिटीझन अगेन्स्ट हेट’ संस्थेचा दावा

उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथील पोलिसांकडून चकमकीच्या नावाखाली हत्या केल्या जात आहेत अन् त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती, तसेच मुसलमान समाजातील लोक सर्वाधिक आहेत

उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के

काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, देहली आणि एन्सीआर् येथे ९ मे या दिवशी दुपारी सवाचार वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

जळगाव महानगरपालिकेचे धर्मांध माजी उपायुक्त तथा उपजिल्हाधिकारी यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद

येथील महानगरपालिकेत नोकरी लावून देणे, घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणे अशी खोटी आमिषे दाखवून ३५ वर्षीय विधवा महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी उपजिल्हाधिकारी धर्मांध साजिद अमानुल्ला पठाण याच्यावर शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला.

कुपोषणग्रस्तांच्या समस्यांच्या निराकरणासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करा !

राज्यातील कुपोषणग्रस्त भागांतील समस्यांविषयी आतापर्यंत दिलेल्या आदेशांच्या कार्यवाहीसाठी काय केले, याचा अहवाल सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

दूध भुकटी प्रकल्पधारकांना प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय

दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा, यासाठी सहकारी आणि खाजगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी उत्पादित करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय ८ मे या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

आध्यात्मिक माहिती असलेल्या पत्रकांचा प्रसादाच्या पुड्या बांधण्यासाठी वापर

महाशिवरात्रीनिमित्त येथील एका आध्यात्मिक संस्थेच्या वतीने प्रबोधनात्मक पत्रके विनामूल्य वितरित करण्यात येत होती. त्यावर महाशिवरात्रीची माहिती दिली होती; मात्र लोकांकडून त्याचा वापर प्रसाद (सुंठवडा) बांधून नेण्यासाठी केला जात होता.