गुरुदेव, विष्णुके तुम अवतार हो ।

महर्षींनी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने ‘कलियुगातील प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण ते हेच आहेत’, असे सांगितले.

धर्माधिष्ठित हिंदूसंघटनाचे प्रणेते !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज प्रत्येक साधक त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे. एखाद्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि ते सोने व्हावे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त परात्पर गुरु पांडे महाराज यांनी गुणगौरवपर आणि कृतज्ञतापूर्वक दिलेला भावसंदेश !

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जन्मोत्सवानिमित्त दिलेला आशीर्वाद ! : ‘जीवेत् शरदः शतम् ।’ म्हणजे आपल्याला ‘शरद ऋतूप्रमाणे आनंददायी शत वर्षांचे आयुष्य लाभो !’

ब्राह्मतेजसे क्षात्रतेजसे हिन्दुसिंहगर्जनाय धीमहि । राष्ट्रतारकाय राष्ट्रनिर्मात्रे राष्ट्रमयाय धीमहि ॥

ब्राह्मतेजस्वरूप आणि क्षात्रतेजस्वरूप असलेले, निद्रिस्त हिंदूंना धर्मासाठी कार्यप्रवण करून) सिंहगर्जना करायला शिकवणारे, (संकटांपासून) राष्ट्राला तारणारे, (हिंदु) राष्ट्र निर्माण करणारे,….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त कल्याण येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेला संदेश !

तीर्थरूप प.पू. डॉ. जयंतराव यांना ७६ व्या जन्मदिनानिमित्त अनेक अंतर्भूत शुभेच्छा ! जीवेत् शरदः शतम् । (अर्थ : तुम्हाला शंभर वर्षांचे आयुष्य लाभो !)

साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती सतत कृतज्ञ रहावे ! – प.पू. रामभाऊस्वामी

‘मी ‘डॉ. आठवले यांना आठवले नाही’, असे एकही दिवस होत नाही. मला प्रतिदिन दैनिक सनातन प्रभात टपालाने मिळते. मी प्रतिदिन दैनिक सनातन प्रभात वाचतांना मला त्यांचे स्मरण होते.

भगवंताप्रमाणे वैशिष्ट्ये असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘सर्वसामान्य मनुष्याचे जीवन काही काळापुरते असल्याने त्याचा वाढदिवस त्याच्या मृत्यूपर्यंतच साजरा होतो. भगवंत अनादि आणि अनंत असल्याने भगवंताच्या अवताराचा जन्मदिवस (उदा. रामनवमी, जन्माष्टमी) भक्तगणांकडून सृष्टीच्या अंतापर्यंत साजरा होत राहील.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमधून ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने सादर केलेले शोधनिबंध

‘भारतात देहली, मुंबई, पुणे आदी ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये, तसेच विदेशातीलही आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने सहभाग घेतला

अखिल मानवजातीच्या उद्धारार्थ जीवन समर्पित केलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांची काही गुणवैशिष्ट्ये !

‘ईश्‍वर परिपूर्ण आहे. तो त्रिगुणातीत असूनही सर्वगुणसंपन्न आहे. त्याचे प्रत्येक कार्य सत्यम्, शिवम् आणि सुंदरम् असेच असते. ईश्‍वरस्वरूप गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेही कार्य ईश्‍वराप्रमाणेच आहे. त्यांची साधकांनी अनुभवलेली काही गुणवैशिष्ट्ये, तसेच काही प्रसंग येथे देत आहोत.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या ‘संगीत’ विभागाने २ वर्षांत केलेला संशोधनात्मक अभ्यास, त्यातून सिद्ध होणारे भारतीय संगीताचे श्रेष्ठत्व आणि ‘कलेतूनही साधना व्हावी’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांची तळमळ !

कोणतीही कला अंगी असणे, ही मनुष्याला ईश्‍वराकडून मिळालेली देणगीच आहे ! कला ही देवदुर्लभ आहे आणि तसेच मनुष्यजन्मही ! मनुष्य जन्माचा उद्देश सफल करण्यासाठी कलेच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्तीसाठी केलेली वाटचाल अधिक सुलभ आणि आनंददायी आहे आणि म्हणूनच ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चा ‘संगीत साधना’ हा विभाग आमच्या प्राणप्रिय अशा गुरुमाऊलीच्या आनंदमय आणि चैतन्यमय अशा वाढदिवसाच्या दिवशी चालू करण्यात आला.