राजस्थान सरकार ‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ म्हणून आयोजित करणार

राजस्थानमधील भाजप सरकारने १४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ पूजन’ दिवस म्हणून आयोजित करण्याचा आदेश दिला आहे. सरकारने २३ एप्रिलला या संदर्भातील परिपत्रक काढले आहे.

भाजप राममंदिर उभारू शकत नाही ! – शंकराचार्य स्वामी

‘केंद्रात आमची सत्ता असल्यामुळे आम्ही अयोध्येत राममंदिर उभारू’, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्याकडून सांगण्यात येते; परंतु घटनेनुसार केंद्र सरकार हे ‘निधर्मी’ आहे.

 विदेशातून मिळणार्‍या निधीचा हिशेब ३ सहस्र २९३ संस्थांकडून प्रलंबित

३ सहस्र २९२ स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्था यांनी त्यांना विदेशातून मिळणार्‍या आर्थिक निधीचा हिशेबच दिलेला नाही, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली.

मद्यप्राशन करून वाहन चालवणार्‍या भाजपच्या पदाधिकार्‍याची पोलिसांना मारहाण

मद्यप्राशन करून वाहन चालवतांना पोलिसांनी रोखल्यावर त्यांना मारहाण करणार्‍या आणि महिला पोलिसाला शिवीगाळ करणार्‍या भाजपच्या पदाधिकार्‍याला अटक करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या सभेला गर्दी नसल्याचे दृश्य दाखवणार्‍या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण

२९ एप्रिलला काँग्रेसकडून येथील रामलीला मैदानावर भाजप सरकारच्या विरोधात ‘जनआक्रोश सभे’चे आयोजन करण्यात आले होते.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनावर राष्ट्रध्वज उलटा लावला !

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी २९ एप्रिल या दिवशी फरीदाबादच्या बडखलमध्ये ‘रोड शो’ केला. या वेळी त्यांच्या वाहनावर लावण्यात आलेला राष्ट्रध्वज उलटा होता.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी समीर टायगर आणि अकीब खान ठार

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम परिसरात हिजबुल मुजाहिद्दीनच्या २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. यातील समीर अहमद भट उपाख्य समीर टायगर हा हिजबुलचा कमांडर स्तराचा आतंकवादी होता