रा.स्व. संघाच्या ‘मुस्लिम राष्ट्र्रीय मंच’च्या वतीने मुंबईत ‘इफ्तार’चे आयोजन !

‘मुस्लिम राष्ट्र्रीय मंच’च्या वतीने रमझानच्या निमित्ताने ४ जून या दिवशी सह्याद्री अतिथीगृहात इफ्तार मेजवानीचे आयोजन केले आहे. यामध्ये ३० देशांचे मुत्सद्दी सहभागी होणार आहेत, तसेच मुसलमान समाजातील २०० प्रतिष्ठित व्यक्तींना या मेजवानीचे आमंत्रण आहे.

‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांमध्ये १ सहस्र ३३० पेक्षा अधिक पालट

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत (एनसीईआरटी)च्या १८२ पाठ्यपुस्तकांमध्ये यंदा १ सहस्र ३३४ पेक्षा अधिक पालट करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीय प्रतिकांवर भर देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील देवस्थानच्या भूमीची निगा, तिचा अनुचित वापर आणि अतिक्रमण यांविषयी तातडीने चोख यंत्रणा निर्माण करावी !

देवस्थानच्या भूमीची निगा, त्यांवरील अतिक्रमण, त्याचा अनुचित वापर यांविषयी राज्य सरकारने तातडीने चोख यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

पाककडून शस्त्रसंधीचे पालन करण्याचा प्रस्ताव भारताकडून मान्य

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या डीजीएम्आेंनी (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सच्या अधिकार्‍यांनी) हॉटलाईनवर केलेल्या चर्चेनंतर शस्त्रसंधी कराराचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बेल्जियममध्ये आतंकवाद्याच्या आक्रमणात २ पोलीस आणि १ नागरिक ठार

बेल्जियमचे औद्यागिक शहर असलेल्या ‘लीज’मध्ये २९ मे या दिवशी एका आतंकवाद्याने केलेल्या गोळीबारात २ पोलीस आणि १ नागरिक ठार झाले. गोळीबारापूर्वी त्याने पोलिसांवर चाकूने आक्रमण केले होते.

गेल्या ७० वर्षांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेच्या सैनिकांमध्ये हुतात्मा झालेल्यांमध्ये भारतीय सैनिकांची संख्या सर्वाधिक

संयुक्त राष्ट्रांच्या गेल्या ७० वर्षांमध्ये विविध शांतीसेनेच्या मोहिमांमध्ये ३ सहस्र ७३७ शांतीरक्षक हुतात्मा झाले आहेत. यांत सर्वाधिक म्हणजे १६३ भारतीय सैनिक हुतात्मा झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार वर्ष १९४८ पासून या मोहिमा राबवण्यात येत आहेत.

साधकांनो, आश्रम, सेवाकेंद्र किंवा निवासस्थान येथे येणार्‍या अनोळखी व्यक्तींविषयी सतर्कता बाळगा !

सनातन संस्थेचे विरोधक सनातन संस्था आणि संस्थेचे साधक यांच्यावर ‘अवैध कारवायांत गुंतलेली’ अथवा ‘राष्ट्रविरोधी संघटना’ असा ठपका ठेवून संस्थेवर बंदी घालण्याचा खटाटोप करत आहेत. विरोधकांचे हस्तक जिज्ञासू असल्याचा अथवा ……

तक्रारी गंभीरपणे घेतल्या जात नसल्याने भारतातील चर्चमध्ये होणार्‍या लैंगिक शोषणाविरुद्ध नन गप्प रहातात ! – ऑनलाईन नियतकालिक ‘दि लेडी फिंगर’चे सर्वेक्षण

पाश्‍चिमात्य देशात चर्चचे धर्मगुरूंकडून लहान मुले आणि तेथे कार्यरत असणार्‍या नन यांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण होत असल्याच्या बातम्या तेथील प्रसारमाध्यमे प्रसारित करत आहेत. भारतातील चर्चमध्येही असेच प्रकार घडत असल्याचे उघडकीस आले आहे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणार्‍या महामार्गांवर १६० ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी होणार !

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या महामार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येणार आहे.