डोकलामवरून मोदी चीनला खडसावणार का ? – काँग्रेसचा प्रश्‍न

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील चर्चेमध्ये मोदी भारताच्या रणनैतिक हितांचे रक्षण करून डोकलामविषयी चीनकडे रोखठोक विचारणा करतील का ?, अशी विचारणा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ‘ट्वीट’द्वारे केली आहे.

भारतीय बाजारपेठ गिळंकृत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मार्केटिंग माफिया तरुणींना ‘मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’ पुरस्कार देतात !

भारतीय महिला ‘कॉस्मेटिक’ किंवा ‘शॅम्पू’ वापरत नाहीत. केस गळू नये, यासाठी मेथीच्या पाण्याने आपण केस धुतो. ‘मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’ अशा सौंदर्य स्पर्धा आयोजित करणारे आंतरराष्ट्रीय मार्केटिंग माफिया आहेत.

अलीगड मुस्लिम विद्यापिठात संघाची शाखा चालू करण्याची अनुमती द्या !

मुसलमान समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधी वातावरण पहायला मिळते. त्यामुळे मुसलमान तरुणांमध्ये संघाविषयी चुकीच्या भावना आहेत. अलीगड मुस्लिम विद्यापिठातही विद्यार्थ्यांमध्ये संघाला ‘धार्मिक संस्था’ म्हणून पाहिले जाते.

(म्हणे) ‘शरीरसुखाची मागणी करण्याचा प्रकार जुनाच असल्याने त्यात खेद वाटण्यासारखे काहीच नाही !’ – अभिनेता शत्रुघ्न सिन्हा

सिनेनृत्य दिग्दर्शिका सरोज खान आणि काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांचे म्हणणे चुकीचे नाही. हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणेच राजकारणातही शरीरसुखाची मागणी आणि तसा प्रस्ताव ठेवला जातो, असे अभिनेता आणि भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे.

छत्तीसगडमध्ये ७ नक्षलवादी ठार

येथे नक्षलवादी आणि सुरक्षादल यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांनी एक एस्एल्आर्, रायफल, ६ रॉकेट लाँचर आणि ३ ग्रेनेड हस्तगत केले.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्येही पोटगी मिळवण्याचा अधिकार ! – मुंबई उच्च न्यायालय

पंधरा वर्षांपासून एका व्यक्तीसमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या एका विवाहित महिलेलाही विशेष घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत पोटगी मिळवण्याचा अधिकार असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने मांडले आहे.

(म्हणे) ‘भाजपप्रणीत सत्यशोधन समिती भिडे आणि एकबोटे यांना वाचवत आहे !’

कोरेगाव भीमा दंगलीच्या संदर्भात मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठीच भाजपने स्वयंघोषित सत्यशोधन समिती सिद्ध केली आहे.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या शिक्षेवर वृत्तवाहिन्यांनी आयोजिलेल्या चर्चासत्रात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रवक्त्यांची सडेतोड उत्तरे

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना २५ एप्रिलला जोधपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या दिवशी देशभरातील विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वृत्तवाहिन्यांनी चर्चासत्रांचे आयोजन केले होते.

(म्हणे) ‘मालेगाव येथे सभा घेण्यासाठी प्रशासनाने अनुमती दिलीच कशी ?’

मालेगाव (नाशिक) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी (७ एप्रिल २०१८ या दिवशी) सभा घेण्यात आली. ही सभा पहिली-दुसरी नसून या आधी अनुमाने २० जिल्ह्यांत हिंदु जनजागरण समितीतर्फे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सभा घेण्यात आल्या.

वाडा तालुक्यात जिवंत बॉम्ब सापडला

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात जिवंत बॉम्ब सापडला आहे. देवळी गावात श्री. महेंद्र पाटील यांच्या शेतात खोदकाम चालू असतांना अचानक एक लोखंडी वस्तू आढळली.


Multi Language |Offline reading | PDF