पू. आसारामजी बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप नसणार्‍या आरोपपत्राची प्रत माझ्याकडे आहे !

पू. आसारामजी बापू यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हाच नाही. त्यांना वरच्या न्यायालयात सहज जामीन मिळू शकतो; कारण माझ्याकडे त्यांच्यावरील आरोपपत्र आणि प्रथमदर्शी अहवालाची प्रत आहे अन् त्यात कुठेही बलात्कार केल्याचा उल्लेख नाही, असा दावा गुजरातचे माजी पोलीस महासंचालक डी.जी. वंजारा यांनी केला आहे.

देशात काँग्रेसच्या देशविघातक राजकारणाच्या विरोधात जागृती करणार ! – साध्वी प्रज्ञासिंह

एका महिलेकडे देशाची सत्ता असतांना संतांना कारागृहात डांबून छळण्यात आले; कारण ती महिला ‘इटलीवाली बाई’ होती, अशी टीका साध्वी प्रज्ञासिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केली.

गुरुवायूर (केरळ) येथील श्रीकृष्ण मंदिरात अहिंदूंना प्रवेश देण्याचा आदेश मागे

येथील प्रख्यात गुरुवायूरमधील श्रीकृष्ण मंदिराच्या भोजनालयात अहिंदूंना प्रवेश देण्याचा मंदिर व्यवस्थापन समितीचा आदेश मंदिराचे प्रमुख पुजारी श्री. पी. चेन्नास नंबुदरीपाद यांनी केलेल्या विरोधानंतर व्यवस्थापनाने मागे घेतला आहे.

भ्रमणभाषशी आधार क्रमांक जोडण्याचा आदेश सरकारला कधीही दिला नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

सर्वोच्च न्यायालयाने सरकारला कधीही भ्रमणभाषशी आधार कार्ड क्रमांक जोडण्यास सांगितले नव्हते. ‘६ फेब्रुवारी २०१७ ला दिलेल्या आमच्या आदेशाचा सरकारने चुकीचा अर्थ काढला आहे’, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह ५ सदस्यीय खंडपिठाने दिले आहे.

(म्हणे) ‘आसाराम बापूजींच्या आश्रमांची सखोल तपासणी करून आश्रम बंद करा !’ – संभाजी ब्रिगेड

आसाराम बापूजींच्या आश्रमांची सखोल तपासणी करून आश्रम बंद करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने आंदोलनाद्वारे केल्याचे वृत्त स्थानिक दैनिकांत प्रसिद्ध झाले आहे.

मशिदींवरील भोंग्यांवरून ऐकवण्यात येणार्‍या अजानवर बंदी घाला ! – ‘नॉर्वे’च्या सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याची मागणी

नॉर्वेमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून दिवसभरात ५ वेळा ऐकवल्या जाणार्‍या अजानवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी देशातील आघाडी सरकारमधील प्रोग्रेस पक्षाचे प्रवक्ते जॉन हेल्गेहम यांनी केली आहे.

ज्योतिष क्षेत्रातील योगदानाविषयी प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांचा सन्मान

ज्येष्ठ कलाकार शाहू मोडक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात शाहू मोडक स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी ज्योतिष क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांना, तसेच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, बालगायिका नंदिनी गायकवाड, तसेच स्वतः दृष्टीहीन असूनही दृष्टीहीनांसाठी कार्य करणारे श्री. राहुल देशमुख यांना पुरस्कार देण्यात आले.

सीबीआयकडे अन्वेषण सोपवण्याच्या मागणीसाठी आरोपींची उच्च न्यायालयात याचिका

जम्मूतील कठुआ येथील कथित बलात्कार प्रकरणातील आरोपींनी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात एक याचिका प्रविष्ट केली आहे. त्यात या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘सीबीआय’कडे) सोपवण्याची मागणी केली आहे.

पाकप्रेमी पोलीस !

‘हुब्बळी, कर्नाटक येथील सदरसोफा या मुसलमानबहुल भागाची तुलना पाकिस्तानशी केल्याच्या प्रकरणी भाजपचे धारवाड येथील खासदार प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला.’

निष्पक्ष सुनावणी झाली नाही, तर कठुआच्या बाहेर खटला चालवू ! – सर्वोच्च न्यायालय

कठुआ येथील कथित बलात्काराच्या प्रकरणाचा खटला स्थानिक न्यायालयामध्ये चालू आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने म्हटले की, जर स्थानिक न्यायालयात या प्रकरणाची निष्पक्ष सुनावणी होत नाही, असे लक्षात आले, तर तो खटला अन्यत्र स्थानांतरित करण्यात येईल.


Multi Language |Offline reading | PDF