अयोध्येत राममंदिर होत असतांना नवीन मशीद बांधू देणार नाही ! – विहिंप

योध्येत राममंदिर निर्माणाची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. ही निश्‍चितच आनंदाची गोष्ट आहे; मात्र त्याच वेळी हे ही निश्‍चित आहे की, अयोध्येच्या सांस्कृतिक सीमेच्या आत कोणतीही नवीन मशीद बांधू देणार नाही, अशा शब्दांत विश्‍व हिंदु परिषदेने चेतावणी दिली आहे.

धुळे येथे संत बसवेश्‍वर यांचे नाव असलेल्या फलकाची विटंबना

येथील बारा पत्थर चौकातील महात्मा बसवेश्‍वर यांच्या नावाने असलेल्या सिमेंटच्या स्तंभावर महात्मा बसवेश्‍वर जयंतीच्या दिवशी म्हणजे १८ एप्रिलला अज्ञाताने काळी शाई टाकून त्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पहाटे ५ वाजता लक्षात आला.

‘एन्आयए’ आंधळे आणि बहिरेही ! – असदुद्दीन ओवैसी यांचा तीळपापड

मक्का मशीद बॉम्बस्फोटप्रकरणी स्वामी असीमानंद यांच्यासह ५ आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यावर हिंदुद्वेषींचा तीळपापड झाला आहे. त्यातून ते राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेवर (‘एन्आयए’वर) टीका करू लागले आहेत.

अतिक्रमणे न हटवल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेनेकडून महानगरपालिकेवर मोर्चा काढून आणि बांगड्या फेकून आंदोलन

येथील तावडे उपाहारगृह परिसरातील अतिक्रमणे न हटवल्याच्या निषेधार्थ १९ एप्रिलला शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढून आणि बांगड्या फेकून आंदोलन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीयतेच्या विरोधात लढा दिला; पण हिंदुत्वाचा त्याग केला नाही – चारुदत्त आफळेबुवा, राष्ट्रीय कीर्तनकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीयतेच्या विरोधात लढा दिला; पण हिंदुत्वाचा त्याग केला नाही. जातीयतेच्या विरुद्ध पुकारलेल्या लढ्यात त्यांनी सर्व जातीच्या लोकांना सामावून घेतले आणि नंतर हिंदु धर्माचा एक भाग असलेला बौद्ध धर्म स्वीकारला

मक्का मशीद बॉम्बस्फोटाचा निकाल देणारे न्यायधीश रेड्डी यांचे त्यागपत्र फेटाळले

मक्का मशीद बॉम्बस्फोटाचा निकाल देणारे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्आयए’च्या) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांचे त्यागपत्र हैदराबाद उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. त्यांना तातडीने कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.

न्यायाधीश लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याने चौकशीची आवश्यकता नाही ! – सर्वोच्च न्यायालय

न्यायाधीश ब्रीजगोपाल लोया यांच्या मृत्यूची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (‘सीबीआय’कडून) स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

रेल्वेच्या वाढदिवसाच्या दिवशीच प्रवासी संघाचे आंदोलन; १२ जणांची अटकेनंतर सुटका !

रेल्वे प्रवास करतांना येणार्‍या समस्यांमुळे प्रवाशांना अनेक यातना सहन कराव्या लागतात. अनेकांचे जीव जातात. याविषयी शांततेत मूक निषेध करण्याचा हक्क या लोकशाहीत नाही का ? असा प्रश्‍न करत रेल्वे प्रवासी संघटनेने प्रशासनाला अनेक प्रश्‍न विचारले.

जिल्हा रुग्णालयातील सोयीसुविधांअभावी रुग्णांची होणारी हेळसांड न थांबवल्यास आंदोलन करू ! – हरिदास जगदाळे, शिवसेना

क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने यात लक्ष घालून रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी. अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी उपजिल्हाप्रमुख श्री. हरिदास जगदाळे यांनी दिला.

पठाणकोट (पंजाब) परिसरात आतंकवादी घुसल्याचा संशय

पंजाबमधील पठाणकोट येथील वायूदलाच्या तळाच्या आसपास आतंकवादी घुसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येथे शोधमोहीम चालवली जात आहे. वर्ष २०१६ मध्ये येथे अशा प्रकारे सैनिकी वेशात आतंकवादी घुसले होते


Multi Language |Offline reading | PDF