अधर्माचरण हे सर्व समस्यांचे मूळ आहे ! – श्री. प्रकाश मालोंडकर, हिंदु जनजागृती समिती

अधर्माचरण हे सर्व समस्यांचे मूळ आहे. धर्माचरणाअभावी आपली ईश्‍वरावरील श्रद्धा अल्प पडते. त्यामुळे आपल्यात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी लागणारे धैर्य नाही. हिंदू जात-पात, संप्रदाय, पक्ष, पद आदींमध्ये विभाजित झाल्याने संघटित नाहीत.

नीरव मोदी यांच्या समर्पणाविषयी हाँगकाँगकडून अद्याप उत्तर नाही ! – परराष्ट्र मंत्रालय

पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील प्रमुख पसार आरोपी नीरव मोदी सध्या हाँगकाँगमध्ये आहेत. त्यांना भारताच्या कह्यात देण्याची हाँगकाँगकडे मागणी करण्यात आली आहे; मात्र यावर त्यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेत करस्वरूपात दिलेल्या पैशाचे काय होते, हे सरकार सांगत नाही ! – रॅप संगीतकार कार्डी बी

अमेरिकन प्रशासन हे इतर विकसनशील देशांप्रमाणेच भ्रष्टाचाराने पोखरले आहे. प्रत्येक वस्तूवर भरमसाठ कर आकारले जातो; परंतु करस्वरूपात जमा केलेल्या पैशांचे नेमके होते काय ? याचे उत्तर करदात्यांना दिले जात नाही, अशी टीका अमेरिकेतील प्रसिद्ध रॅप संगीतकार कार्डी बी यांनी केली आहे.

सिरीयावरील आक्रमणाच्या विरोधात संयुक्त राष्ट्रात रशियाने मांडलेला निषेध ठराव फेटाळला

सिरीयामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांनी संयुक्तरित्या केलेल्या आक्रमणाचा निषेध करण्यासाठी रशियाने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळात प्रस्ताव मांडून हे आक्रमण त्वरित थांबवण्याची मागणी केली होती. त्याला चीन आणि बोलिव्हिया यांनी पाठिंबा दिला होता.

भाजपला निवडणुकीत लाभ होईल, या भीतीने समाजवादी पक्षातील मुसलमान नेत्यांना वादग्रस्त विधाने टाळण्याचा अखिलेश यादव यांचा सल्ला

वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पक्षातील मुसलमान नेत्यांना भाजपला लाभ होईल, असे कोणतेही वादग्रस्त विधान करू नये, असा सल्ला दिला आहे.

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अपात्र ठरवणार्‍या पाकच्या न्यायाधिशांच्या घरावर दोनदा गोळीबार

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश इजाज उल एहसान यांच्या निवासस्थानी अज्ञातांनी काही घंट्यांच्या अंतराने दोन वेळा गोळीबार केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भ्रमणभाषच्या (स्मार्टफोनच्या) अतीवापरामुळे नैराश्य आणि चिंता यांत वाढ होते ! – अमेरिकेतील सर्वेक्षण

भ्रमणभाषच्या (स्मार्टफोनच्या) अतीवापरामुळे एकटेपणासह नैराश्य आणि चिंता यांनी व्यक्ती ग्रासली जाते, असे अमेरिकेच्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

क्लेशदायी कठुआकांड !

बलात्कारासारखे कुकर्म, मग ते कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने केले असेल, निंदनीयच आहे. याविषयी कोणाचेही दुमत असू नये.

हिंदूंनी धर्माचरण करून समाजाला योग्य दिशा द्यावी ! – मदन सावंत, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी गुढीपाडवा साजरा करू नये, यासाठीच औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना हालाहाल करून मारले. औरंगजेबाचे ते असुरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी  काही संघटना गुढीपाडवा आणि अन्य हिंदूंच्या सणांविषयी संभ्रम निर्माण करून अपप्रचार करतात.

९० टक्क्यांंपेक्षा ४० टक्केवाल्यांना महत्त्व देण्यात आल्याने भारत मागास !

जेव्हा ४० टक्केवाल्याला ९० टक्क्याच्या आधी स्थान दिले जाते, तेव्हा देश मागे पडू लागतो. जे राष्ट्रासाठी घातक आहे. हा ब्राह्मणांचा नव्हे, तर प्रतिभेचा अपमान आहे, असे वक्तव्य मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री गोपाळ भार्गव यांनी केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now