स्वामी असीमानंद यांच्यासह ५ आरोपी ११ वर्षांनंतर दोषमुक्त

भाग्यनगर (हैद्राबाद) येथील मक्का मशिदीत १८ मे २००७ या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी सबळ पुराव्यांअभावी स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व ५ आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.

गेल्या १ मासात चीनची लडाख आणि अरुणाचल प्रदेश येथे ३५ वेळा घुसखोरी

गेल्या एका मासात चीनने लडाख आणि अरुणाचल प्रदेश येथे ३५ वेळा घुसखोरी केली. भारत-तिबेट सीमा पोलिसांनी (आयटीबीपी) त्यांना विरोध केल्यावर चिनी सैन्य माघारी गेले.

चिपळूण येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा आविष्कार !

भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिपळूणच्या भूमीत १६ एप्रिल या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला हिंदूंचा उदंड प्रतिसाद मिळाला.

कल्याण येथे चोर असल्याचे खोटे आरोप करून ३ हिंदु तरुणांना धर्मांधांकडून अमानुष मारहाण

येथील ३ हिंदु तरुणांना धर्मांधांच्या मोठ्या जमावाने अमानुष मारहाण केल्याची घटना ११ एप्रिल या दिवशी येथील पश्‍चिम भागात घडली. त्यांपैकी पहिला तरुण चोर असल्याचा बनाव धर्मांधांकडून करण्यात आला.

‘नार्को’ चाचणी झाल्यावर सत्य समोर येईल ! – आरोपी

येथील कठुआमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची सुनावणी येथील मुख्य दंडाधिकारी न्यायालयामध्ये १६ एप्रिलपासून चालू झाली. या वेळी सर्व ८ आरोपींना न्यायालयात आणण्यात आले होते.

बंदूक हे समस्येचे उत्तर नाही !

बंदूक हे कोणत्याही समस्येचे उत्तर नाही, याची जाणीव काश्मिरी तरुणांना लवकरच होईल, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केले. जम्मू-काश्मीर लाइट इन्फट्रीच्या ७० व्या स्थापनादिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात रावत बोलत होते.

आधुनिक चिकित्सेतील उपकरणांमुळे उपचार महागले ! – पुरी पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

आधुनिक चिकित्सापद्धतीमध्ये मोठी त्रुटी आहे. रुग्णाच्या शरिराच्या पुढे काहीही नाही, असेच या पद्धतीत मानले जाते. सूक्ष्म, कारण आणि स्थूल असे शरिराचे तीन भाग होतात. याचा अभ्यास वैदिक चिकित्सापद्धतीत करण्यात आला आहे, तो आधुनिक चिकित्सेमध्ये नाही.

भारतीय वैज्ञानिक निर्मित आणि जगात प्रथमच बनवण्यात आलेले डेंग्यूवरील औषध पुढच्या वर्षी बाजारात येणार !

भारतातच नव्हे, तर जगातही पहिल्यांदा डेंग्यूवर औषध बनवण्यात आले असून ते औषध भारतीय वैज्ञानिकांनी बनवले आहे. त्याच्या प्राथमिक चाचण्या पूर्णपणे यशस्वी ठरल्या आहेत. हे औषध बाजारात आणण्यापूर्वी जागतिक निकषांनुरूप त्याच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या घेतल्या जात आहेत.

पोलिसांच्या आरोपपत्रावर प्रसारमाध्यमांकडून शंका उपस्थित

कठुआ येथील मंदिरात झालेल्या कथित सामूहिक बलात्काराच्या संदर्भात प्रतिदिन वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. प्रसारमाध्यमेच ही माहिती प्रसारित करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF