बीड येथे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

भाग्यनगरचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह हे येथे ८ एप्रिलला हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत मार्गदर्शन केल्यानंतर पोलीस संरक्षणात स्वतःच्या सफारी गाडीतून परतीच्या प्रवासाला निघाले असता त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले.

रामसेतू संशोधन प्रकल्प नाही ! – भारतीय इतिहास संशोधन मंडळ

‘रामसेतू मानवनिर्मित होता कि नैसर्गिक ?’, याचा शोध घेण्यासाठी भारतीय इतिहास संशोधन मंडळाने कुठलेही संशोधन करण्याचे ठरवलेले नाही किंवा त्यासाठी निधी देण्याचाही प्रस्ताव नाही, असे मंडळाचे अध्यक्ष अरविंद जामखेडकर यांनी सांगितले.

काँग्रेसचे दलितांसाठी देहलीमध्ये भरपेट खाऊन-पिऊन उपोषण

देशभरात दलितांवर होणार्‍या कथित अत्याचारांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने ९ एप्रिलला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले; मात्र हे उपोषण नाटकी होते, हे उघडकीस आले असून विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचे समर्थन केले.

हिमाचल प्रदेशमध्ये शाळेची बस दरीत कोसळून चालकासहित २४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

कांगडा जिल्ह्यातील नूरपूर येथे दुपारी ४ वाजता रामसिंह पठानिया या खासगी शाळेची बस २०० फूट खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातामध्ये चालक आणि २४ विद्यार्थी यांचा मृत्यू झाला

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा

नक्षलवाद्यांनी येथे केंद्रीय राखीव पोलीसदलाच्या एका बसमध्ये केलेल्या स्फोटामध्ये २ पोलीस हुतात्मा, तर ५ जण घायाळ झाले. या स्फोटात विजापूरच्या मुख्य मार्गाची मोठी हानी झाली आहे.

पसार आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये पाकचे ४ राजनैतिक अधिकारी

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्आयए’ने) जारी केलेल्या पसार (फरार) जिहादी आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये पाकच्या आमिर जुबैर सिद्दीकी या राजनैतिक अधिकार्‍याचा समावेश करण्यात आला आहे.

नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राचे समर्थन करणारे आचार्य श्रीनिवास यांच्यावर गोळीबार

नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्याच्या मागणीचे समर्थक असलेले आचार्य श्रीनिवास यांच्यावर नेपाळच्या विराटनगर येथे ८ एप्रिलला सकाळी अज्ञातांनी गोळीबार केल्याने ते गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

काशीमध्ये ७० देशांमधील विद्यार्थी शिकत आहेत संस्कृत !

येथे ७० देशांमधील १९० विद्यार्थी संस्कृत भाषा शिकत आहेत. या ठिकाणी अमेरिका, म्यानमार, कोरिया, श्रीलंका आणि थायलंड या देशांचे विद्यार्थीही संस्कृत ही भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत.