पोलिसांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हिंसाचार

बंगालमध्ये पंचायतींच्या ६० सहस्र जागांसाठी १, ३ आणि ६ मे या दिवशी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट, भाजप आणि काँग्रेस पक्षांचे नेते अन् कार्यकर्ते यांना उघडपणे धमकावल्याच्या अन् मारहाण केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह ४ जणांना अटक

निवडणुकीच्या वादातून २ शिवसैनिकांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर आणि भानुदास कोतकर यांना पोलिसांनी अटक केली.

चेंबूर येथे मिरवणुकीत श्रीरामाविषयीची गाणी लावल्याच्या प्रकरणी धर्मांधांच्या तक्रारीवरून ३ हिदुत्वनिष्ठांना अटक !

चेंबूर येथे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत श्रीरामाविषयीची गाणी लावली आणि घोषणा दिल्या, या कारणावरून धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार धर्मांधांनी केली.

पाक सैन्याच्या विरोधात वृत्त प्रसारित केल्याने प्रसिद्ध ‘जियो न्यूज’ वृत्तवाहिनीवर बंदी

पाकमधील प्रमुख वृत्तवाहिनींपैकी एक असलेल्या ‘जियो न्यूज’वर बंदी घालण्यात आली आहे. पाक सरकार आणि सैन्य यांच्या विरोधात बातम्या दाखवल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कोनगाव (ठाणे) येथील श्री खाटुशामबाबा मंदिरात ३ लक्ष रुपयांची चोरी

येथील ताडाळी-कामतघर परिसरात गुजराथी आणि राजस्थानी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री खाटुशामबाबा  मंदिरातून ५ एप्रिलला रात्री २ वाजता चोराने २ दानपेट्यांतील ३ लाख रुपये चोरले.

गांधी यांचे मारेकरी दहशत निर्माण करत आहेत ! – ओवैसी

ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यामध्ये काहीही सहभाग नोंदवला नाही; मात्र मोहनदास गांधी यांच्या मारेकर्‍यांची ज्यांनी साथ दिली, त्या शक्तींचा देशात भयावह वातावरण निर्माण करण्यामागे हात आहे

महिलांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने न बघणारे गोवा पोलीस !

‘वाळपई सत्तरी (गोवा) येथे एक तरुण येथील एका महिला दुकानदाराची बरेच दिवसांपासून विविध प्रकारे छेड काढत होता. तो महिलेला भ्रमणभाषवर सतत संपर्क करणे, लघुसंदेश पाठवणे, बसने घरी जात असतांना तिची छेड काढणे, अशा प्रकारे तिला त्रास देत होता.

वरुणराजाच्या आशीर्वादानंतर धर्मप्रेमींच्या अपूर्व उत्साहात बीड येथील हिंदु धर्मजागृती सभेत सहस्रो हिंदूंच्या साक्षीने हिंदुत्वाची ललकारी !  

वरुणराजाच्या आशीर्वादानंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमानंतर धर्मप्रेमींच्या अपूर्व उत्साहात येथील हिंदु धर्मजागृती सभेत सहस्रो हिंदूंच्या साक्षीने हिंदुत्वाची ललकारी देण्यात आली.

काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांच्या समर्थनार्थ पाकमध्ये भित्तीपत्रके

पाकची राजधानी इस्लामाबाद आणि रावळपिंडी शहरामध्ये काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांच्या समर्थनार्थ भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत.

सर्वजण एकाच सनातन धर्माचे अनुयायी असल्याची भावना हिंदूंमध्ये निर्माण करणे आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जातीच्या आधारावर आरक्षण देऊन पुन्हा एकदा देशाचे विभाजन केले जात आहे, तर दुसरीकडे ‘जातीयवाद गुन्हा आहे, तो नष्ट केला पाहिजे’, असाही प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे समाजात भ्रम निर्माण होऊन आपल्या देशाची मोठी हानी होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF