प्रखर धर्मनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर सुटलेल्या प्रखर धर्मनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ५ एप्रिल या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात आगमन झाले.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक शशिकांत राणे यांचे निधन

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक शशिकांत सीताराम राणे (वय ६९ वर्षे) यांचे ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

७ एप्रिलला मालेगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा !

मालेगाव मध्ये धडाडणार हिंदू राष्ट्राची तोफ ! अधिकाधिक हिंदूंनी हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहावे !!!

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेते सलमान खान यांना ५ वर्षांचा कारावास

येथे वर्ष १९९८ मध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी काळवीटांची शिकार केल्याच्या प्रकरणी अभिनेते सलमान खान यांना जोधपूर येथील न्यायालयाने ५ एप्रिल या दिवशी ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

सरकारच्या नियंत्रणांतील मंदिरांच्या व्यवस्थापन समित्यांवर नियुक्ती करण्याच्या नियमांत पालट करा !

केरळमधील सर्व मंदिरांवर नियंत्रण आणण्याच्या सत्ताधारी साम्यवादी सरकारच्या कारस्थानाला केरळ उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे सुरुंग लागला आहे.

काश्मीरमध्ये दगडफेक आतंकवादामुळे झालेल्या अपघातात २ पोलीस हुतात्मा

अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर देशद्रोह्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने एका दुचाकीला धडक दिली

पाककडून होणार्‍या गोळीबारांमुळे सरकार सीमेवरील नागरिकांसाठी १४ सहस्रांहून अधिक बंकर्स उभारणार

पाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून करण्यात येणार्‍या गोळीबारामुळे सीमारेषेवरील अनेक गावांतील लोकांचा नाहक बळी जातो.

‘पश्‍चिम’ शब्दाचा खरा अर्थ बहुतांश भारतियांना ज्ञात नाही !

१. ख्रिस्तींचे ‘पूर्व ख्रिस्ती’ आणि ‘पश्‍चिमी ख्रिस्ती’ असे झालेले विभाजन !
‘ख्रिस्त्यांमधील आपापसांतील भांडणांमुळे २ राजांना वेगवेगळे बसण्याची आवश्यकता वाटली. त्या वेळी २ ख्रिस्ती क्षेत्रांचे विभाजन करण्यात आले.

रामनाथ (अलिबाग) येथे २२ एप्रिलला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त धर्मप्रेमींसाठी एक दिवसीय शिबीर पार पडले

येथे २ एप्रिल या दिवशी रामनाथ येथील देऊळ भेरसे या गावी २२ एप्रिलला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या सिद्धतेच्या पार्श्‍वभूमीवर धर्मप्रेमींसाठी एक दिवसीय शिबीर पार पडले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मजागृती सभा, बैठका, राष्ट्रीय हिंदू आंदोलने, धर्मशिक्षण वर्ग घेण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार

पनवेल आणि रामनाथ (अलिबाग) तालुक्यात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते यांच्या भेटी घेतल्या. धर्माभिमानी, हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करतांना श्री. घनवट यांच्यासमवेत सध्याची राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती यांवर चर्चा झाली.


Multi Language |Offline reading | PDF