गदारोळामुळे संसदेचे कामकाज सलग १९ व्या दिवशीही ठप्प !

संसदेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रात राज्ससभेत विरोधी पक्षांच्या सदस्यानी ४ एप्रिल या दिवशीही केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

हिंदु धर्माचे विभाजन होऊ देणार नाही ! – अमित शहा

लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देणे, म्हणजे हिंदूंचे विभाजन करण्याचे पाऊल आहे. लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजाला हिंदु धर्मापासून तोडण्याचा हा डाव असून……

मायावती यांनी १ कोटी ६८ लाख रुपयांचे थकित वीजदेयक भरल्यानंतर त्यांच्या निवासस्थानातील वीजपुरवठा पूर्ववत !

उत्तरप्रदेश राज्य संपत्ती विभागाने थकित वीज देयक भरण्याविषयी दबाव आणल्याने राज्याच्या माजी मुख्यमंत्री तथा बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी तब्बल १ कोटी ६८ लाख रुपयांचे थकित वीज देयक भरले.

लातेहार (झारखंड) येथे ५ नक्षलवादी ठार

येथील नक्षलग्रस्त असलेल्या लातेहारमधील सेरेंदाग जंगलात सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले. सेरेंदाग जंगलामध्ये नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षादलाला मिळताच ……

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांच्याशी भेट

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक श्री. लोकेंद्र सिंह कालवी यांची जयपूर येथील त्यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट घेतली.

दाऊद इब्राहिम आणि हाफीज सईद हे आतंकवादी घोषित

अमेरिकेनंतर आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आतंकवादी आणि आतंकवादी संघटना यांची सूची घोषित केली आहे. यामध्ये वर्ष १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आणि कुख्यात…..

केजरीवाल सरकारमध्ये ‘रेशन घोटाळा’ झाल्याचा ‘कॅग’चा ठपका

केजरीवाल सरकारमध्ये ‘रेशन घोटाळा’ झाला असल्याचा ठपका ‘कॅग’च्या अहवालात ठेवण्यात आला आहे. ‘कॅग’ने देहली सरकारचे अर्थ विभाग, महसूल विभाग आणि समाज कल्याण विभाग यांच्याशी संबंधित…..

बीड शहरात सभेच्या प्रचारासाठी लावलेली भित्तीपत्रके समाजकंटकांनी फाडली

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रचार गतीने चालू आहे. सभेच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे.

प्रसारमाध्यमांविषयी सरकारची दंडुकेशाही नको ! – संपादकांची संघटना

खोट्या बातम्या प्रसारित करणार्‍या पत्रकाराची मान्यताच रहित करण्याविषयी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रारंभी घेतलेल्या पवित्र्यावर ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संपादकांच्या संघटनेने तीव्र आक्षेप घेतला.