‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

आम्ही जो निर्णय दिला, तो आंदोलनकर्त्यांनी व्यवस्थित वाचलेला नाही. आम्ही कोणताही पालट सुचवलेला नसून न्यायालय कायद्याच्या विरोधातही नाही; मात्र यामुळे निरपराध्यांना शिक्षा व्हायला नको

निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत श्री हनुमानाच्या मूर्तीची वाहतूक रोखली

येथील सर्वज्ञनगर क्षेत्रातील कोदंडराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेसाठी नरसापूर येथून नेण्यात येणार्‍या श्री हनुमानाच्या मूर्तीची वाहतूक निवडणूक आयोग आणि पोलीस यांनी रोखली.

आरक्षणाविषयी अफवा पसरवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न ! – गृहमंत्री

‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यातील पालटाच्या विरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला काही राज्यांमध्ये हिंसक वळण लागले. आरक्षण संपवण्याविषयीच्या अफवा पसरवून हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

करोली (राजस्थान) येथे आजी-माजी आमदारांची घरे जाळली

सर्वोच्च न्यायालयाने ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यामध्ये सुचवलेल्या पालटाविरोधात येथील आजी-माजी आमदारांची घरे आंदोलकांच्या संतप्त जमावाने जाळली.

पाकच्या गोळीबारात महाराष्ट्रातील सैनिक शुभम मुस्तापुरे हुतात्मा

काश्मीरमधील सीमारेषेवर पाकिस्तानने ३ एप्रिल या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात भारतीय सैनिक हुतात्मा झाला. शुभम मुस्तापुरे (वय २० वर्षे) असे या सैनिकाचे नाव असून ते परभणीतील कोनरेवाडी गावचे रहिवासी होते.

गडचिरोली येथे ३ नक्षलवादी ठार

येथे सी-६० कमांडो आणि नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. यात २ महिला नक्षलवादी, तर सुनील कुळमेथे हा ३० लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी होता.

इराकमधील मृत पावलेल्या भारतियांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून १० लाख रुपयांचे साहाय्य

इराकमधील मोसूल या शहरात इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेने हत्या केलेल्या ३८ भारतियांच्या कुटुंबांना सरकारने प्रत्येकी १० लाख रुपये अर्थसाहाय्य करण्याची घोषणा केली आहे.

इयत्ता १० वीची गणिताची फेरपरीक्षा न घेण्याचा सी.बी.एस्.ई.चा निर्णय

सी.बी.एस्.ई.च्या पेपरफुटीप्रकरणी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांची गणिताची फेरपरीक्षा न घेण्याचा निर्णय ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’ने (‘सी.बी.एस्.ई.’ने) घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF