दैनिक सनातन प्रभातच्या गोवा-सिंधुदुर्ग आवृत्तीचा आज तिथीनुसार वर्धापनदिन

दैनिक सनातन प्रभात, गोवा-सिंधुदुर्ग आवृत्ती : आज तिथीनुसार वर्धापनदिन

दलित संघटनांच्या ‘भारत बंद’ला हिंसक वळण : ७ ठार

सर्वोच्च न्यायालयाने ‘अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्या’विषयी (‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याविषयी) नुकताच एक निर्णय दिला. त्या विरोधात दलित-आदिवासी संघटनांनी २ एप्रिलला ‘भारत बंद’ पुकारला होता.

(म्हणे) ‘सर्वोच्च न्यायालयाने कुरघोडीच्या राजकारणात उडी घेतली आहे !’ – प्रकाश आंबेडकर

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे. प्रथम माहिती अहवाल (एफ्आयआर्) नोंदवून घेणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. त्याउलट अ‍ॅट्रॉसिटीच्या तक्रारीविषयी पडताळणी….

बनावट नोटांची तस्करी करणार्‍या दोघांना अटक

बांगलादेशातून अवैधरित्या भारतात पाठवण्यात येणार्‍या २ सहस्र रुपयांच्या अनुमाने १० लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा कोलकातामार्गे बेंगळुरू येथे घेऊन जाणार्‍या दोघांना महसूल खात्याच्या गुप्तचर विभागाने अटक केली.

पालापाचोळा, तसेच अन्य घटक वापरून अंत्यसंस्कार करणार !

लाकडामुळे प्रदूषण होते, असे कारण पुढे करत सांगली महापालिकेने पालापाचोळा, तसेच अन्य घटक यांचा वापर करून बनवलेले ‘मोक्षकाष्ट’ वापरून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

(म्हणे) ‘काश्मिरी हिंदूंनी काश्मीर खोर्‍यात परत यावे !’ – जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती

काश्मिरी हिंदूंनी काश्मीर खोर्‍यात परत यावे, असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले. देहलीत आयोजित करण्यात आलेल्या काश्मिरी हिंदूंच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

काश्मीरमध्ये ‘होमलॅण्ड’ (स्वतःची भूमी) मिळाल्यासच विस्थापित काश्मिरी हिंदू परततील ! – पनून कश्मीर

काश्मीरमध्ये ‘होमलॅण्ड’ (स्वतःची भूमी) मिळाल्यासच विस्थापित  काश्मिरी हिंदू खोर्‍यात परत जातील, असे प्रतिपादन विस्थापित काश्मिरी हिंदूंसाठी कार्यरत असणार्‍या ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे अध्यक्ष श्री. अश्‍वनीकुमार च्रोंगू यांनी केले.

अन्न आणि औषध विभागाकडून सदोष औषधांचे रुग्णांना वितरण

अन्न आणि औषध प्रशासनाकडून बाजारात नागरिकांसाठी उपलब्ध असलेले खाद्यान्न आणि औषधे गुणवत्ता पडताळण्याचे दायित्व आहे. बाजारात औषधे येण्यापूर्वी त्यांचे परीक्षण केले जाते

हिंदुत्वाचा सारांश म्हणजे श्रद्धा होय ! – मोहन भागवत

‘मुक्त’ची भाषा राजकारणात चालते; राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आम्ही ही भाषा मुळीच करत नाही. सारा समाज आम्हाला संघटित करायचा आहे. विरोध करणार्‍यालाही आम्हाला सोबत न्यायचे आहे.