काश्मीरमध्ये सैन्याकडून १३ आतंकवाद्यांना कंठस्नान

काश्मीरमधील अनंतनाग आणि शोपियां येथेे सुरक्षा दल अन् आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत १३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. या वेळी ३ सैनिक हुतात्मा झाले.

जयपूर (राजस्थान) येथे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक

जैतारण या भागात हनुमान जयंतीच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. ही मिरवणूक येथील अल्पसंख्यबहुल भागातून जात असतांना अचानक मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली.

काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकारने फुटीरतावादी नेत्यांच्या हालचालींवर लादलेले निर्बंध हटवले !

जम्मू-काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकारने सय्यद अली शाह गिलानी यांच्यासह अन्य फुटीरतावादी नेत्यांच्या हालचालींवर लादलेले निर्बंध ३१ मार्च या दिवशी हटवले.

‘जी-सॅट ६ए’ उपग्रहाशी संपर्क तुटला – इस्रो

नुकत्याच प्रक्षेपण करण्यात आलेल्या ‘जी-सॅट ६ ए’ या दूरसंचार उपग्रहाशी संपर्क तुटला असल्याची माहिती ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात् ‘इस्रो’ने दिली.

‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राज्यशासन पुनर्विचार याचिका करणार

सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या प्रकरणी निर्णय देतांना ‘अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा अपवापर झाला’, असे मत नोंदवले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांवर या कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यापूर्वी त्यांच्या वरिष्ठांची….

पंजाबमध्ये रा.स्व. संघाच्या शाखांवर आतंकवादी आक्रमणाची शक्यता

पंजाब राज्यात रा.स्व. संघाच्या चालणार्‍या शाखांवर आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता आहे, अशी चेतावणी गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

भागलपूर (बिहार) येथील दंगलीच्या प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक

भागलपूर येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणी केंद्रीय मंत्री अश्‍विनी चौबे यांचा मुलगा अर्जित शाश्‍वत यांना भागलपूर पोलिसांनी अटक केली. १७ मार्च या दिवशी भागलपूर येथे निघालेल्या ……

‘सीबीएस्ई’च्या पेपरफुटीप्रकरणी देहलीतील ३ शिक्षकांना अटक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (‘सीबीएस्ई’च्या) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणी देहली पोलिसांनी ३ शिक्षकांना अटक केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव महानगराध्यक्षांकडून मालेगाव अपर जिल्हाधिकार्‍यांना दम

येथे पकडण्यात आलेल्या वाळूच्या १० ट्रकला न्यून दंड आकारण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव महानगराध्यक्ष नीलेश पाटील यांनी मालेगाव अपर जिल्हाधिकार्‍यांना गळ घातली


Multi Language |Offline reading | PDF