राष्ट्र हे राजकीय पक्ष आणि संघटन यांमुळे नव्हे, तर हिंदु धर्म अन् समाज यांची परिपक्वता यांमुळे टिकले आहे ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र

‘भाजप सरकारची छोटीशी चूक जरी निदर्शनास आणून दिली, तरी काही लोक तात्काळ ‘त्याला संधी द्या’, असा सल्ला देतात. हिंदु धर्माच्या छायेविषयीही राग असणार्‍या काँग्रेससारख्या पक्षाला हिंदूंनी ७० वर्षे धीराने सहन केले. त्यामुळे हिंदू भाजपलाही संधी देणारच आहेत. हा पक्ष हिंदुत्वासाठी काही तरी नक्कीच करतो

देशभरातील डॉक्टरांचा २ एप्रिलचा देशव्यापी संप मागे !

देशभरातील डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी २ एप्रिल या दिवशी पुकारलेला देशव्यापी संप तात्पुरता मागे घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसह डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची एक बैठक २ एप्रिल या दिवशी आयोजित केली आहे. ती पार पडल्यानंतर संपाविषयी निर्णय घेण्यात येणार आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संशोधन कार्याचा १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०१८ मधील आढावा

भारतात देहली, मुंबई, पुणे आदी ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये, तसेच विदेशातीलही आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने सहभाग घेतला आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्मातील संशोधनावर आधारित त्यांनी लिहिलेले शोधनिबंध सादर केले. या शोधनिबंधांचे विषय अध्यात्म, सात्त्विक संस्कृत भाषा, जप, मंत्रजप, भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, मूर्तीकला इत्यादी होते.

क्रोएशिया येथील एस्.एस्.आर्.एफ्. च्या आश्रमात गुढीपाडवा भावपूर्ण वातावरणात साजरा !

क्रोएशिया येथील एस्.एस्.आर्.एफ्. च्या आश्रमात गुढीपाडवा भावपूर्ण वातावरणात साजरा !

न्यायपालिकेत सरकारचा हस्तक्षेप ! – न्यायमूर्ती चेलमेश्‍वर यांचे सरन्यायाधीशांना पत्र

न्यायपालिका आणि सरकारमधील कोणत्याही प्रकारचे सख्य लोकशाहीसाठी मृत्यूची घंटा आहे. न्यायपालिकेत सरकारच्या हस्तक्षेपाच्या सूत्रावर पूर्णपीठ बोलावण्याविषयी विचार करावा, असे विनंतीपर पत्र सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती चेलमेश्‍वर यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पाठवले आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. मिलिंद खरे यांनी केले ‘गुढीपाडव्याचे महत्त्व’ विशद !

येथील ‘ईस्ट मिडलॅण्ड्स मराठी असोसिएशन’च्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने १७ मार्च या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी गुढीपूजन झाल्यानंतर महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे डॉ. मिलिंद खरे यांनी ‘गुढीपाडव्याचे महत्त्व’ ‘स्लाईडशो’द्वारे विशद केले. याचा लाभ १८० हून अधिक हिंदूंनी घेतला.

सरकारचे दायित्व !

खटल्यांच्या सुनावण्यांना ६ मासांहून अधिक काळ लागता कामा नये !’ , असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरिमन आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या खंडपिठाने दिला.

हिंदूंचे भोग !

श्रीरामनवमीच्या उत्सवानंतर बिहारमधील औरंगाबाद, मुंगेर, नालंदा, भागलपूर आणि समस्तीपूर येथे दंगली उसळल्या. हिंदूंच्या उत्सवांत दंगली उसळणे, हे आता नवीन राहिलेले नाही.

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवेसाठी साधकांची आवश्यकता !

‘पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांच्या ‘गौतमारण्य’ आश्रमात आणि श्रीराम पंचायतन मंदिरामध्ये विविध सेवांसाठी सेवाभावी वृत्तीच्या साधकांची आवश्यकता आहे.

प्रयाग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर तणाव

प्रयाग शहरात शहरातील एका चौकात काही अज्ञात व्यक्तींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. ३० मार्चला रात्री ही घटना घडली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now