पोलिसांनी ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांची रथयात्रा रोखली !

आझाद मैदान येथे मुसलमान संघटनेचे आंदोलन असल्याचे कारण देत मुंबई पोलिसांनी ‘राष्ट्र निर्माण संघटने’चे अध्यक्ष तथा सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली ‘भारत बचाओ’ रथयात्रा परळ येथे रोखली.

अरुणाचल प्रदेशमध्ये कुरापतखोर चीनने छावण्या बांधल्या !

डोकलामच्या सूत्रावरून वाद चालू असतांनाच चीनने आता अरुणाचल प्रदेशमध्ये नव्या कुरापती करण्यास प्रारंभ केला आहे. अरुणाचल प्रदेशमधील किबिथु या भागात चीनने छावण्या आणि घरे बांधल्याचे उघड झाले आहे.

इस्रायली सैन्याशी झालेल्या संघर्षात पॅलेस्टाइनच्या १७ नागरिकांचा मृत्यू

पॅलेस्टाइनच्या नागरिकांकडून ४२ व्या ‘भूमी दिवसा’च्या (‘लॅण्ड डे’च्या) निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चाच्या वेळी गाझापट्टीत इस्रायली सैन्याशी झालेल्या संघर्षात पॅलेस्टाइनच्या १७ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेत किमान २ सहस्र नागरिक घायाळ झाले. या घटनेनंतर पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी ‘राष्ट्रीय दुखवटा’ घोषित केला असून तेथील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, विद्यापिठे बंद रहाणार आहेत.

भाजपचे खासदार प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात गुन्हा नोंद

हुब्बळी येथील सदरसोफा या मुसलमानबहुल भागाची तुलना पाकिस्तानशी केल्याच्या प्रकरणी भाजपचे धारवाड येथील खासदार प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

पू. भिडेगुरुजी यांच्या मोर्च्यानंतर दैनिक सनातन प्रभातचे वितरण करणार्‍या सनातनच्या साधकांना दमदाटी !

२८ मार्च या दिवशी पू. भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ सांगलीत मोर्चा काढण्यात आला होता. या दिवशी पू. भिडेगुरुजी यांच्या संदर्भातील विशेष मजकूर दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. हा मजकूर हिंदुत्वनिष्ठांपर्यंत पोहोचण्यासाठी सनातनचे काही साधक मोर्चा संपल्यावर धारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना दैनिक सनातन प्रभात वितरण करत होते.

आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत आवाज उठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्रातील राष्ट्रद्रोही विषयावरील परिसंवाद रोखला

मुंबई विद्यापिठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चाचत्रातील ‘भारतीय सैनिकांनी काश्मीरचा घेतलेला ताबा आणि तेथील महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार’ या राष्ट्रद्रोही विषयावरील परिसंवादाच्या विरोधात विधानसभेत आवाज उठवून भाजपचे आमदार श्री. अतुल भातखळकर यांनी हा परिसंवाद रोखला.

मनुष्याने त्याची बुद्धी अध्यात्माला समर्पित केली, तर त्याचा उत्कर्ष होईल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

नेपाळमधील ‘न्यूज २४’ वाहिनीचे निवेदक श्री. कृष्ण प्रसाद खनाल यांचा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी वार्तालाप

एका शहरात अनेक वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत असलेल्या साधकांची गुप्तचर विभागाच्या पोलिसांकडून चौकशी

‘एका शहरात पोलिसांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत असलेल्या साधकांची, तसेच पूर्वी साधना करत असलेल्या; मात्र सध्या काही कारणांमुळे साधना करत नसलेल्या साधकांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी अशा साधकांची यादी केली आहे आणि ते या साधकांच्या घरी जाऊन चौकशी करत आहेत.

संचारबंदी असलेल्या भागात जाण्याचा प्रयत्न केल्याने केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात गुन्हा नोंद

हिंसाचार झालेल्या आसनसोल भागात संचारबंदी लागू असतांना तेथे जाण्याचा प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात पोलिसांनी प्रथमदर्शी अहवाल प्रविष्ट करत गुन्हा नोंदवला आहे.


Multi Language |Offline reading | PDF