मुंबई येथे अखिल भारतीय किसान सभेचा भव्य मोर्चा

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी १२ मार्चला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई असा भव्य मोर्चा काढण्यात आला. नाशिक येथून निघालेला मोर्चा ठाणे, विक्रोळी, घाटकोपर या मार्गाने….

शेतकर्‍यांच्या ९५ टक्के मागण्या मान्य ! – मुख्यमंत्री

‘अखिल भारतीय किसान सभे’च्या मोर्च्यातील आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि शासन यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून शेतकर्‍यांनी केलेल्या मागण्यांपैकी ९५ टक्के मागण्या शासनाने मान्य केल्या…..

देशातील १ सहस्र ७६५ खासदार आणि आमदार यांच्यावर गुन्ह्यांची नोंद

देशातील १ सहस्र ७६५ खासदार आणि आमदार यांच्यावर ३ सहस्र ४५ गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. यात उत्तरप्रदेशात सर्वाधिक, त्यानंतर तमिळनाडू आणि नंतर बिहार या राज्यांतील लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.

काठमांडूत विमान कोसळून ५० जण ठार

ढाक्याहून काठमांडूला जाणारे ‘यूएस्-बांगला एअरलाइन्स’चे विमान नेपाळमधील काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतांना कोसळले. या अपघातात अनुमाने ५० जण ठार झाले.

इंडोनेशिया येथील ‘सनातन धर्म गमा साधना’ या संघटनेच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान

हिंदु धर्माभिमानी श्री. गोपालन् यांनी स्थापन केलेल्या ‘सनातन धर्म गमा साधना’ या संघटनेची मासिक बैठक १० मार्च या दिवशी जकार्ता येथील रेडस्टार या हॉटेलमध्ये झाली.

प्रमोद मुतालिक यांच्यासह श्रीराम सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

मंगळुरू येथील पबमध्ये झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणात दक्षिण कन्नड तिसर्‍या जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व ३० आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक…..

‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची दिशा मिळण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

धुळे येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित दोन दिवसीय ‘प्रांतीय हिंदू अधिवेशना’ची सांगता धुळे, १२ मार्च (वार्ता.) – प्रसारमाध्यमे आयुष्यभर हिंदु धर्मासाठी त्याग करणार्‍या शंकराचार्यांच्या देहत्यागाच्या बातमीला महत्त्व न देता अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातमीला अधिक महत्त्व देतात, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे आवश्यक आहे. समाजाला दिशा देण्याचे कार्य हिंदु … Read more

टीडीपीचे राजकीय गणित !

हो-नाही करत अखेर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रातील भाजप सरकारशी फारकत घेतली. याचाच एक भाग म्हणून केंद्रात कार्यरत असलेल्या तेलगु देसम्च्या मंत्र्यांनी त्यागपत्रे दिली आहेत.

राज्यातील अनुमाने ९ लाख अल्पवयीन मुली बालकामगार

राज्यातील अनुमाने ९ लाख अल्पवयीन मुली या बालकामगार आहेत. तसेच प्राथमिक शिक्षण घेणार्‍या मुलींपैकी अनुमाने एकतृतीयांश मुली माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नाहीत, असे ‘चाईल्ड राईट्स अ‍ॅण्ड यू’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणी अहवालातून लक्षात आले आहे

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now