लेनिन यांचा पुतळा हटवल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी पुतळ्यांच्या तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ !

रशियन क्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन यांचा त्रिपुरातील पुतळा नुकताच हटवण्यात आला. त्यानंतर तमिळनाडू, कोलकाता आणि मेरठ येथील विविध ठिकाणी पुतळ्यांच्या तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली.

नवीन कुमार यांच्या विरोधात ठोस पुरावाच नाही ! – विशेष अन्वेषण पथकाच्या अधिकार्‍याची माहिती

गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केलेले ‘हिंदु युवा सेने’चे श्री. नवीन कुमार यांच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला नाही, अशी माहिती विशेष अन्वेषण पथकाच्या (एस्आयटीच्या) अधिकार्‍याने दिली.

निरपराध हिंदु कार्यकर्त्यांना नाहक गोवण्याचे षड्यंत्र थांबवा ! – विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात निरपराध हिंदु कार्यकर्त्यांना नाहक गोवण्याचे षड्यंत्र थांबवावे, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली.

पुणे महापालिकेसमोर ब्राह्मण महासंघाने दादोजी कोंडदेवांच्या प्रतिमेचे पूजन केल्याने संभाजी ब्रिगेडकडून विरोध

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुणे महापालिकेच्या आवारात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शोपियां येथील सैन्याच्या कारवाईच्या विरोधात फुटीरतावाद्यांकडून ‘काश्मीर बंद !’

शोपियां येथील सुरक्षा दलाच्या चकमकीत मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ फुटीरतावादी नेत्यांनी ७ मार्च या दिवशी ‘काश्मीर बंद’ पुकारला होता. शोपियां येथे नुकत्याच झालेल्या चकमकीत दोघा आतंकवाद्यांसह त्यांचे अन्य सहकारीही ठार झाले.

मिटमिटा येथे आंदोलकांची कचर्‍याच्या गाड्यांवर जोरदार दगडफेक : पोेलिसांवर आक्रमण !

येथे गेल्या २० दिवसांपासून पेटलेल्या कचरा प्रश्‍नावरील आंदोलनाने ७ मार्च या दिवशी हिंसक वळण घेतले. संभाजीनगर – मुंबई महामार्गावरील मिटमिटा आणि पाडेगावात कचरा टाकण्यास आलेल्या २ वाहनांवर संतप्त नागरिकांनी जोरदार दगडफेक केली

कर्नाटकमध्ये सुनावणी चालू असतांनाच लोकायुक्तांवर चाकू हल्ला

कर्नाटकचे लोकायुक्त पी. विश्‍वनाथ शेट्टी यांना त्यांच्या कार्यालयात घुसून चाकूने भोसकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. शेट्टी यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

समाजजीवन सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे ‘सुराज्य अभियान’! – मनोज खाडये

सध्याच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक  समस्यांवर केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना. समाजजीवन सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू केले आहे.

स्पष्ट बोलण्याचे दुष्परिणाम भोगत आहे ! – मुख्यमंत्री

नाणार प्रकल्पासंदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला अगोदर दिलेले उत्तर मागे घेऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नवीन उत्तरे सभागृहासमोर ठेवली.