श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी घोषित

बौद्ध आणि मुसलमान यांच्यातील वाढलेल्या हिंसेच्या पार्श्‍वभूमीवर श्रीलंका सरकारने १० दिवसांची आणीबाणी घोषित केली. कँडी या श्रीलंकेच्या मध्यवर्ती जिल्ह्यात झालेल्या दंगलीनंतर लगेचच आणीबाणीची घोषणा करण्यात आली.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्रिपुरामधील लेनिन यांचा पुतळा बुलडोझरद्वारे पाडला

रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन यांचा दक्षिण त्रिपुरामधील बेलोनिया शहरामध्ये असलेला पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी ५ मार्चला ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देत बुलडोझरद्वारे पाडला.

उत्तरप्रदेश पोलिसांकडून करण्यात येणार्‍या ‘एन्काऊंटर’च्या भीतीने सहस्रो आरोपींकडून जामीन रहित

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या पहिल्या११ मासांच्या, म्हणजेच मार्च २०१७ ते जानेवारी २०१८ या कार्यकाळात पोलिसांनी १ सहस्र ३३१ चकमकी (एन्काऊंटर) केल्या आहेत.

कुपोषित बालकांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर !

६ मास ते ६ वर्षे वयोगटातील कुपोषित बालकांच्या संख्येत महाराष्ट्र राज्य देशात पाचव्या क्रमांकावर असल्याविषयी लोकसेवा समितीच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

नक्षलवाद्यांच्या धमकीच्या पार्श्‍वभूमीवर तेलंगणचे मुख्यमंत्री ७ कोटी रुपयांची ‘बुलेटप्रूफ’ बस घेणार

गेल्या आठवड्यात सैनिकांनी १० नक्षलवाद्यांना ठार मारल्यानंतर नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तेलंगणच्या गृह विभागाने मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवली आहे.

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना गोवून निधर्मीवाद्यांची मते लाटण्याचा काँग्रेस सरकारचा अश्‍लाघ्य डाव !

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात ‘हिंदु युवा सेने’चे श्री. नवीन कुमार यांना अटक  करण्यात आली. ‘पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात लहानसा धागाही शोधून काढण्यात अपयशी ठरलेल्या कर्नाटकातील काँग्रेस सरकारने आता पुढील मासात होऊ घातलेली निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचे षड्यंत्र रचले आहे.

लव्ह जिहादविषयी जनजागृती करणे आवश्यक ! – साध्वी अनादि सरस्वती

लव्ह जिहाद ही समस्या वाढत आहे. याविषयी आणखी जनजागृती करणे आवश्यक आहे. भारतातील हिंदू जातीजातीत विभागले गेले होते; परंतु अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय उपस्थित झाल्यापासून सर्व हिंदू एक होत आहेत.

रामजन्मभूमीचा प्रश्‍न वेळीच सोडवला नाही, तर भारताचा सीरिया होईल ! – श्री श्री रविशंकर

रामजन्मभूमीचा प्रश्‍न वेळीच सोडवला नाही, तर भारताचा सीरिया होईल, अशी भीती ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केली आहे. हे प्रकरण न्यायालयाच्या बाहेर सामोपचाराने मिटावे, यासाठी श्री श्री रविशंकर प्रयत्न करत आहेत.

भारतात कम्युनिस्ट, पाद्री आणि मुसलमान फुटीरतावादी हे संयुक्त मोर्चा असल्याप्रमाणे कार्यरत आहेत !

‘कम्युनिस्टांनी ख्रिस्ती पाद्य्रांची नक्कल करून ‘theology’ च्या जागेवर ‘Ideology’ सादर केली. त्यांचा उद्देश संपूर्ण समाजावर पापपूर्ण नियंत्रण मिळवणे, हाच होता. यामुळेच पश्‍चिमी युरोपातील प्रबुद्धांनी साम्यवादाला बहिष्कृत केले

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now